सर्वात मोठी अपडेट, संजय राऊत यांची प्रकृती बिघडली

On: October 13, 2025 1:58 PM
sanjay raut
---Advertisement---

Sanjay Raut Hospitalaised | शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील भांडुप येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांना अचानक रुग्णालयात का दाखल करावे लागले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. ही परिषद संपल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. कोणतीही रिस्क न घेता त्यांना तत्काळ फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांनी याच रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. आता डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण :

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे”, असे त्यांनी म्हटले होते. ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. (Sanjay Raut Hospitalaised)

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली आहे. तसेच, गेल्या कित्येक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सातत्यानं वक्तव्य करत आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं पक्षाची भूमिकाही प्रभावीपणे मांडत आहेत.

Sanjay Raut Hospitalaised | शिवसेनेची धडाडती तोफ :

उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. (Sanjay Raut Hospitalaised) संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात.

Join WhatsApp Group

Join Now