“अजून एका गुलामाची भर पडली”; संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं

On: May 12, 2024 4:22 PM
Sanjay Raut criticizes Raj Thackeray
---Advertisement---

Sanjay Raut | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे मनसेकडून सध्या महायुतीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला जातोय. स्वतः राज ठाकरे देखील अनेक सभा घेत आहेत. यावरूनच ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

त्यांनी राज ठाकरे मजबुरी म्हणून भाजपसोबत गेले असल्याचा दावा केलाय. इतकंच नाही तर, राज ठाकरे घाबरले आहेत की दुसरं काही कारण आहे ते 4 तारखेनंतर कळेल. मात्र मोदी-शाह यांना महाराष्ट्रात येऊ देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोला राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

“भाजप पक्षात अजून एका गुलामाची भर पडलीये”

“भाजप पक्षात खूप गुलाम आहेत. आता त्यात अजून एका गुलामाची भर पडलीये. एवढ्या सभा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर आज पक्ष राहिला असता”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असता संजय राऊत यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर प्रहार केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टार्गेट केलं. “एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वत:चं असं काहीच नाही. लोकं त्यांना मतं देणार नाहीत. महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे. अजित पवार गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदे गटालाही एकही जागा मिळणार नाही.”, असा दावा राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे.

“मोदींनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी”

“मुख्यमंत्र्यांकडे अमाप पैसा आहे. बेहिशोबी पैसा, गैरमार्गाने मिळवलेला पैसा आहे. तो पैसा वाटप करायला ते येत आहेत. बाकी काय करणार? पैशाच्या वाटपावर निवडणूक जिंकता येणार नाही. लोकांना पैसे नकोय. त्यांना फक्त मोदींची राजवट घालवायची आहे.”, असंही राऊत यांनी म्हटलंय.

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असं आव्हानच राऊत यांनी केलंय. राहुल गांधी, उद्धव ठाकरेंप्रमाणे मोदींनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी. त्यांनी गेल्या 10 वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असं राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

News Title- Sanjay Raut criticizes Raj Thackeray 

महत्वाच्या बातम्या-

नवव्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने तोंड उघडलं, सगळं खरं खरं सांगून टाकलं

बीडमध्ये कोण निवडून येणार?; मनोज जरांगेंचं भाकीत

क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार?, जय शहा निर्णय घेण्याच्या तयारीत

“फडणवीस राजकारणातील कच्च मडकं, त्यांना..”; संजय राऊतांची खोचक टीका

वेळेवर नाश्ता दिला नाही म्हणून नवऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल!

Join WhatsApp Group

Join Now