“…तर मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते…”; संजय दत्तचं धक्कादायक वक्तव्य

On: March 10, 2025 6:09 PM
Sanjay Dutt Shocking Statement on Daughter Trishala 
---Advertisement---

Sanjay Dutt | बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. यात तो त्याची मुलगी त्रिशला (Trishala) बाबत बोलताना दिसून येत आहे. संजय दत्तचा ‘भूमी’ हा चित्रपट जेव्हा आला होता, त्यावेळीची ही मुलाखत आहे.  यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याला त्याच्या ऑनस्क्रिन मुलीबद्दल तसेच खरी मुलगी त्रिशलाबद्दल विचारण्यात आले असता, त्याने धक्कादायक उत्तर दिले. त्याचे हे वक्तव्य ऐकून उपस्थित सर्वच जण स्तब्ध झाले होते.

बॉलिवूडमध्ये मुलांचे पदार्पण आणि संजय दत्तची भूमिका

सध्या अनेक बॉलिवूड स्टार्सची मुले अभिनय क्षेत्रात प्रवेश करत आहेत. शाहरुख खान (Shah Rukh Khan) पासून ते सैफ अली खान (Saif Ali Khan) पर्यंत, अनेकांचे वारसदार आता सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, संजय दत्तने आपल्या मुलांसाठी हा मार्ग निवडणं योग्य वाटत नसल्याचं म्हटलं. संजय दत्तने आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट दिले, पण त्याच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे, अशी त्याची इच्छा नाही.

“माझ्या मुलीने अभिनयात यायचं ठरवलं असतं तर…”

पत्रकार परिषदेत ‘भूमी’ चित्रपटासंदर्भात संवाद साधताना, संजय दत्तला त्याच्या ऑनस्क्रिन मुलगी अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि खरी मुलगी त्रिशला यांच्यातील साम्याबाबत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला होता की, “जर त्रिशलाने अभिनय क्षेत्रात यायचा निर्णय घेतला असता तर मी तिचे पाय तोडले असते. पण ऑनस्क्रिन मुलीसोबत (अदिती) मात्र मी असं काही करणार नाही.” त्याच्या या विधानावर उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

“माझ्या मुलीच्या डोक्यातून अभिनयाचे भूत गेले”

संजयला त्याची मुलगी त्रिशला अभिनयात येऊ नये असे वाटते. त्याने स्पष्ट केले की, “मला आनंद आहे की सध्या तरी त्रिशलाने अभिनयाचा विचार सोडून दिला आहे. ती हुशार आहे आणि तिने फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास केला आहे.” संजय दत्तने यापूर्वीही अनेकदा म्हटले आहे की तो मुलीबाबत अधिक कडक वागतो.

मुलीच्या प्रेमसंबंधांबाबत संजय दत्तचे मत

संजय दत्तला (Sanjay Dutt) त्याच्या मुलीच्या डेटिंगबद्दलही देखील विचारण्यात आले होते. यावर त्याने म्हटले होते की, “जर माझा मुलगा प्रेमात असल्याचे सांगायला आला तर ठीक आहे. पण जर माझी मुलगी सांगायला आली, तर मलाही माहिती असायला हवं की तो कोण आहे आणि काय करतो.” संजयच्या या प्रतिक्रियेमुळे तो आपल्या मुलांच्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहे, हे दिसून आलं होतं.

Title : Sanjay Dutt Shocking Statement on Daughter Trishala 

 

Join WhatsApp Group

Join Now