धक्कादायक! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीच्या गाडीचा भीषण अपघात

On: September 30, 2024 6:18 PM
Accident
---Advertisement---

Accident l गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या अपघातामध्ये अनेक नागरिकांचा बळी देखील जातो. अशातच आज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात आज अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात :

भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला आहे. संबंधित अपघाताची ही धक्कादायक घटना ही धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगावमध्ये घडली आहे. मात्र या धक्कादायक अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या घटनेत संजना जाधव आणि गाडीचा चालक हे दोघेही थोडक्यात बचावले आहेत.

यावेळी एका पिकअप गाडीने समोरुन संजना जाधव यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही अपघाताची घटना घडली आहे. तसेच अपघाताच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ बचावासाठी आले. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी देखील बचावासाठी ताबडतोब धाव घेतली.

Accident l या घटनेतील दोघेही सुखरूप :

मात्र या घटनेत संजना जाधव आणि त्यांच्या गाडीचा चालक हे दोघेही सुखरुप असल्याची माहिती समोर मिळाली आहे. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर देखील सुरक्षित आहे. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे नेतेमंडळी देखील वेगवेगळ्या भागातील मोर्चेबांधणी करत आहेत.

अशावेळी अनेक जण रस्तेमार्गाने प्रवास करताना दिसत आहे. तसेच रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या देखील राजकारणात सक्रीय आहेत. संजना जाधव यांचे पती कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे होते. मात्र कौटुंबिक कलहानंतर दोघेही वेगळे झाले आहेत.

News Title- Sanjana jadhav car accident

महत्त्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा BMW ची इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या किंमत

सरकार म्हणजे विषकन्या; भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

धक्कादायक! पुणे जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, 42 जखमी तीन गंभीर

पवारांची बारामती हादरली! ‘या’ नामांकित कॉलेजमध्ये चाकू खुपसून विद्यार्थ्याचा खून

अजितदादांची स्मार्ट खेळी! फोनद्वारे केला पहिला उमेदवार जाहीर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now