“मी पुन्हा तीन वेळा गर्भवती राहीन, पण…”, शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचं वक्तव्य चर्चेत!

On: May 5, 2025 1:34 PM
sania mirza
---Advertisement---

Sania Mirza | प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) नुकतेट एका मुलाखतीमध्ये मातृत्व स्वीकारल्यानंतर येणाऱ्या भावनिक अडचणींबद्दल मनमोकळी चर्चा केली. आई झाल्यानंतरच्या काळात तिला कोणत्या गोष्टी कठीण वाटल्या, यावर तिने प्रांजळपणे आपले मत मांडले आणि अनेक स्त्रियांना आपल्या भावनांशी रिलेट करता येईल अशा गोष्टी सांगितल्या.

स्तनपानाचा भावनिक संघर्ष-

बाळाला स्तनपान करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना सानियाने (Sania Mirza) सांगितले की, हा अनुभव त्यांच्यासाठी शारीरिक पेक्षा जास्त मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकवणारा होता. त्यांनी असेही म्हटले की, “मी पुन्हा तीन वेळा गर्भवती राहीन, पण हे दूध पाजण्याचे काम माझ्यासाठी खूप कठीण आहे, मला नाही माहीत मी ते करू शकेन की नाही. माझ्यासाठी हा शारीरिक मुद्दा नव्हता…”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानियाने (Sania Mirza) स्तनपानाचा अनुभव किती दमवणारा होता आणि त्याचा तिच्या मानसिक व भावनिक स्थितीवर कसा परिणाम झाला, यावर अधिक सविस्तर चर्चा केली. त्यांच्या मते, हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होता आणि त्यातून जाणे सोपे नव्हते.

नोकरी आणि मातृत्व: सानियाची प्रामाणिक कबुली-

एक कार्यरत आई (Working Mother) म्हणून त्यांना वाटणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेबद्दलही सानिया यांनी मोकळेपणाने सांगितले. करिअर आणि कुटुंब यांच्यातील समतोल साधताना अनेक मातांना ज्या अनुभवातून जावे लागते, तसेच काहीसे सानिया यांनी अनुभवले. त्यांचे हे प्रामाणिक विचार अनेक महिलांना नक्कीच आपलेसे वाटतील.

विशेषतः, जेव्हा त्यांना कामासाठी आपला मुलगा इझान (Izhaan) अवघ्या सहा आठवड्यांचा असताना त्याला सोडून प्रवासाला जावे लागले, तेव्हा त्यांना प्रचंड अपराधी वाटल्याचे त्यांनी नमूद केले. या अनुभवामुळे त्यांना नोकरी करणाऱ्या आईच्या भूमिकेतील भावनिक गुंतागुंत अधिक जाणवली.

News Title – Sania Mirza Opens Up Motherhood Challenges

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now