Sania Mirza | भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने नुकतेच मातृत्व आणि स्तनपानाबाबतच्या आपल्या भावनिक प्रवासाविषयी मनमोकळेपणाने सांगितले आहे. तिने कबूल केले की मुलाला, इझान मिर्झा मलिकला (Izhaan Mirza Malik), दूध पाजणे हे तिच्यासाठी गर्भधारणेपेक्षाही अधिक भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक होते.
स्तनपानाचे भावनिक आणि मानसिक कष्ट-
एका मुलाखतीत बोलताना सानिया मिर्झा (Sania Mirza) म्हणाली की, तिने सुमारे अडीच ते तीन महिने आपल्या बाळाला स्तनपान केले. हा अनुभव तिच्यासाठी शारीरिकदृष्ट्या फारसा त्रासदायक नव्हता, परंतु भावनिक आणि मानसिक पातळीवर तो खूप थकवणारा होता. बाळाच्या पोषणासाठी केवळ आपल्यावर अवलंबून असल्याची भावना आणि त्याचे प्रचंड दडपण होते.
View this post on Instagram
रात्रीची अपुरी झोप आणि बाळाला सतत दूध पाजण्याच्या वेळा यामुळे तिचा थकवा वाढत गेला. एक कार्यरत महिला म्हणून, बाळाच्या या गरजेमुळे तिला खूप बांधल्यासारखे वाटत होते. बाळाची सर्व कामे आणि स्वतःच्या ॲक्टिव्हिटीज दूध पाजण्याच्या वेळेनुसारच ठरवाव्या लागत असल्याने वेळेचे खूप बंधन येत होते, असे सानियाने सांगितले. सानिया आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा मुलगा इझान याचा जन्म २०१८ मध्ये झाला होता.
हा अनुभव अत्यंत कठीण होता
सानियाने (Sania Mirza) सांगितले की तिने तीन महिने स्तनपान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर तिला जाणवले की हे करणे तिच्यासाठी खूप कठीण होत आहे. तीन महिन्यांनंतर तिने आपल्या बालरोगतज्ञाशी (Paediatrician) संपर्क साधला आणि सांगितले की ती यापुढे हे करू शकत नाही. डॉक्टरांनी तिला आणखी एक महिना प्रयत्न करायला सांगितले, पण सानियाला वाटले की ती हे करत राहिल्यास आपले मानसिक संतुलन गमावून बसेल.
गर्भधारणेनंतर शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि सार्वजनिक जीवनात असल्याने लोकांकडून होणारे बॉडी-शेमिंग (Body-shaming) यामुळे ती आधीच अनेक गोष्टींचा सामना करत होती. अशा परिस्थितीत आपल्या बाळाच्या अन्नाची संपूर्ण जबाबदारी फक्त आपल्यावर आहे आणि जर काही झाले तर आपण तिथे नसू ही भीती तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप वेदनादायक होती. याच कारणांमुळे आणि मुलाच्या लहानपणी त्याला पुरेसा वेळ देण्यासाठी तसेच त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणण्यासाठी तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतल्याचेही यापूर्वी सांगितले होते.






