छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी होणार?

On: November 18, 2023 3:24 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

मुंबई | मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत संभाजीराजे यांनी ही मागणी केली आहे.

सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावं अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, असं ते म्हणालेत.

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत, असं संभाजीराजेंनी म्हटलंय.

मंत्री छगन भुजबळ यांनी काल मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरात छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध करण्यात आला आहे.

बार्शी तालुक्यातील मालवंडी गावामध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा निषेध केला गेला. छगन भुजबळ यांनी यापुढे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करु नये. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांनो आताच व्हा सावध; बाहेर पडताना काळजी घ्या 

मोठी बातमी! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय!

वर्ल्डकप फायनलआधी राज ठाकरेंचं सर्वात मोठं वक्तव्य!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now