भन्नाट प्रकल्प! देशातील ‘या’ हायवेवर होतेय वीज निर्मिती

On: September 25, 2025 11:15 AM
Samruddhi Highway
---Advertisement---

Samruddhi Highway | मुंबई आणि नागपूरला जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता फक्त वेगवान प्रवासासाठीच नव्हे, तर सौरऊर्जा निर्मितीसाठीही ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या महामार्गावर देशातील पहिल्यावहिला ग्रीन हायवे सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. (Samruddhi Highway)

प्रकल्पाची सुरुवात आणि क्षमता :

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील करंजलाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे सौरऊर्जा प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ९ मेगावॅट असून त्यापैकी करंजलाड येथे ३ मेगावॅट आणि मेहकर येथे २ मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली आहे. या पायलट प्रकल्पाच्या यशामुळे भविष्यात महामार्गावरील अशा अनेक प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

MSRDC ने समृद्धी महामार्गावर एकूण २०४ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे महामंडळाला टोलव्यतिरिक्त शाश्वत उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होईल. ‘महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी लि.’ या विशेष कंपनीच्या माध्यमातून महावितरणसोबत वीज विक्रीचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार प्रति युनिट ३.०५ रुपये दराने वीज विक्री होणार आहे.

Samruddhi Highway | पर्यावरणीय फायदे आणि कार्बन क्रेडिट :

या प्रकल्पामुळे फक्त वीज निर्मितीच होणार नाही, तर पर्यावरणीय समतोल राखण्यासाठीही मोठा फायदा होईल. सौरऊर्जा निर्मितीमुळे कार्बन क्रेडिट मिळणार असून, त्याचा उपयोग आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कर्ज मिळवण्यात होईल. त्यामुळे हा प्रकल्प आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या प्रकल्पाच्या यशामागे MSRDC चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड तसेच सह-व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखालील पथकाचे विशेष योगदान आहे. भविष्यात केवळ समृद्धी महामार्गच नव्हे, तर राज्यातील इतर महामार्गांवरही असे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

News Title: Samruddhi Highway Becomes India’s First Solar Power Highway with 204 MW Renewable Energy Project

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now