डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सरकारने उचललं सर्वात मोठं पाऊल!

On: November 2, 2025 12:22 PM
---Advertisement---

Sampada Munde Case | सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा खळबळजनक दावा मृत डॉक्टर महिलेचे कुटुंबीय तसेच विरोधक करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर काही पुरावे सादर करत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Sampada Munde Case)

आता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सखोल तपास व्हावा यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने हा तपास एका तडफदार महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. (Sampada Munde Case) या अत्यंत संवेदनशील प्रकरणाच्या तपासासाठी तडफदार महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या या एसआयटीचे नेतृत्त्व करतील.

त्वरीत अहवाल सादर करावा

तेजस्वी सातपुते आणि त्यांच्या पथकाला या प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू करण्याचे आणि लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत डॉक्टरच्या कुटुंबियांनी आणि विरोधी पक्षांनी (विशेषतः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी) ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा खळबळजनक दावा केला होता. तसेच, स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. विरोधकांचा वाढता दबाव आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने हा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. यामुळे या मृत्यूमागचे सत्य आणि गूढ बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे. (Sampada Munde Case)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मूळच्या बीड जिल्ह्यातील (Beed) असलेल्या आणि सातारा सरकारी रुग्णालयात (Satara Government Hospital) कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरचा मृतदेह गेल्या महिन्यात, 23 ऑक्टोबरच्या रात्री, फलटण येथील एका हॉटेलमधील खोलीत आढळला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

News Title- SIT Established Under IPS Tejaswi Satpute

Join WhatsApp Group

Join Now