“सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा”; संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

On: August 5, 2025 1:00 PM
Sambhaji Bhide controversy
---Advertisement---

Sambhaji Bhide controversy | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारे वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. नाशिकमधील एका कार्यक्रमात त्यांनी “सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा” असे विधान करत लोकशाही संकल्पनेवरच सवाल उपस्थित केला. यासोबतच त्यांनी लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. (Sambhaji Bhide controversy)

“सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष – म्हणजे नपुसंकपणा,” असे स्पष्ट शब्दांत भिडेंनी सांगितले. त्यांच्या मते, भगवा ध्वज हा भारताच्या संस्कृतीचा प्राचीन प्रतीक असून तोच खरा राष्ट्रध्वज असायला हवा. “१५ ऑगस्टला आपण तिरंगा फडकवतोच, पण भगवा फडकवण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

‘आंब्यामुळे मुलं होतात’ यावरही ठाम :

याआधी वादात सापडलेल्या “आंबा खाऊन मुलं होतात” या विधानावरही भिडे ठाम राहिले. “मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आंबे खाऊन पाहा,” असं म्हणत त्यांनी यावरून सुरु असलेल्या खटल्याचाही उल्लेख केला. या विधानाला माध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी संताप व्यक्त केला.

तसेच भिडे यांनी कार्यक्रमात “ग्रहणाच्या वेळी मंत्रजप केल्यास जन्मोजन्मी त्याची शक्ती मिळते” असे अध्यात्मिक विधान करत गायत्री मंत्र व शिवाजी महाराजांचा तपश्चर्येचा दाखला दिला. या वक्तव्यात त्यांनी धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ एकत्र गुंफले.

Sambhaji Bhide controversy | लाल किल्ल्यावर भगवा आणि ‘हिरोजी फर्जंद’ची आठवण :

भिडे म्हणाले, “१५ ऑगस्टला तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले कार्य तेच आहे.” यासोबतच त्यांनी हिरोजी फर्जंदांचा संदर्भ देत देशासाठी कटिबद्ध राहण्याचं आवाहन केलं. (Sambhaji Bhide controversy)

त्यांनी स्पष्ट केलं की, “सर्वधर्म समभाव हे नीचपण आहे. देव, धर्म आणि देश यासाठी निष्ठावान राहा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवर चर्चा आणि टीका यांचे वादळ उठले आहे.

Sambhaji Bhide controversy | गणोजी शिर्केवरही जहरी टीका :

भिडे गुरुजींनी इतिहासातल्या गणोजी शिर्केवर जहरी टीका करत, “तो नालायक माणूस वतनासाठी शेण खाल्लं,” असे शब्द वापरले. यासोबतच त्यांनी सोयराबाई यांची इच्छा संभाजी महाराजांसाठी नव्हती, असंही म्हटलं.

त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची तुलना थेट शिवाजी महाराजांशी करत “ते तोडीस तोड व्यक्तिमत्त्व होते,” असं ठासून सांगितलं. त्यांच्या या विधानांमुळे अनेक इतिहासप्रेमी आणि तज्ज्ञही नाराजी व्यक्त करत आहेत.

News Title: Sambhaji Bhide Calls ‘Sarvadharma Sambhav’ Impotence, Pushes for Bhagwa Flag at Red Fort

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now