Salman Khan Net Worth | सलमान खानच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

On: December 27, 2023 12:59 PM
Salman Khan
---Advertisement---

Salman Khan Net Worth |  बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा (Salman Khan Birthday) आज (27 डिसेंबर) आज 58 वा वाढदिवस आहे. सलमान खान गेली तीन दशकं बॉलिवूडवर राज्य करतोय. सलमान खानने (Salman Khan) प्रसिद्धी तर मिळवलीच पण भरपूर संपत्तीही कमावली. त्याची एकूण संपत्ती जाणून कोणालाही धक्का बसेल.

सलमान खानच्या संपत्तीचा आकडा समोर

सलमान खान गेल्या 3 दशकांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. अत्यंत कमी फी घेऊन त्यांनी चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला होता, पण आज तो अब्जावधींच्या संपत्तीचा मालक आहे.

सलमानने 1988 मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यामध्ये तो सहाय्यक भूमिकेत दिसला होता. यामध्ये काम करण्यासाठी सलमान खानला केवळ 11 हजार रुपये फी मिळाली. आता तो एका चित्रपटात काम करण्यासाठी करोडो रुपये घेतो.

‘बिग बॉस’च्या एका एपिसोडसाठी सलमान खान 12 कोटी रुपये घेतो. तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टायगर 3’ या चित्रपटासाठी त्याने निर्मात्यांकडून 100 कोटींहून अधिक फी जमा केली होती. सलमान खान एका सोशल मीडिया पोस्टवरून तो 50 लाख रुपये कमावतो.

Salman Khan Net Worth

सलमानची एकूण संपत्ती 2850 कोटी रुपये आणि वार्षिक उत्पन्न 200 कोटी रुपये आहे. सलमान खानचं मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट सतत चर्चेत असतं. या भव्य आणि आलिशान अपार्टमेंटची किंमत 114 कोटी रुपये आहे. पनवेलमधील सलमानच्या फार्महाऊसची किंमत 94 कोटी रुपये आहे.

सलमान खानची चिंबई रोडवर 17 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. गोराई बीचवर त्यांचं घर आहे, ज्याची किंमत 35 कोटी रुपये आहे. याशिवाय सलमान खानच्या मुंबई आणि दुबईमध्ये तीन मालमत्ता आहेत, ज्यांची किंमत करोडोंची आहे. सलमान खान ‘सलमान खान फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसचा मालक आहे. सलमानकडे Range Rover Vogue, LX470, Audi RS7, Mercedes S Class, AMG GLE 43, Land Cruiser, BMW X6 सारख्या उत्तम गाड्या आहेत. त्याच्याकडे काही स्पोर्ट्स बाइक्सही आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Aishwarya Rai | अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य, म्हणाला ‘ऐश्वर्यामुळे माझ्या लेकीची”

Jio ची बंपर ऑफर!, फक्त एवढ्या रुपयांमध्ये 336 दिवस मिळणार फ्री डेटा आणि अनलिमिडेट कॉल

Electronic Soil | शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

Jacqueline Fernandez | ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का?’; तिहारमधून सुकेशची जॅकलिनला थेट धमकी

Mahindra | ‘या’ कारचा बाजारात धुमाकूळ; विक्रीचे मोडले सगळे रेकॉर्ड

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now