सलमानला विचारण्यात आला ऐश्वर्या रायबद्दलचा प्रश्न, सलमान म्हणाला…

On: May 11, 2024 5:55 PM
Salman-Aishwarya Relationship
---Advertisement---

Salman Khan | बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान नेहमी कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकताच त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. त्याची सध्या चर्चा आहे मात्र अशातच आता सलमान खान (Salman Khan) एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. सलमान खान (Salman Khan) हा सिकंदर या सिनेमात झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे. याचसोबत आता करण जोहरने ऐश्वर्या रायबाबत एक प्रश्न केला. त्यावर सलमानने उत्तर दिलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री जगजाहीर आहे. सलमान खानची (Salman Khan) अनेकांसोबत नावं जोडली गेली आहेत. अभिनेता अभिषेक बच्चनसोबत ऐश्वर्याचं लग्न झालं आणि तिला आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. तरी आजही ऐश्वर्या आणि सलमानच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहके उस्तुक असतात. अशात एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात करणने सलमान खानला (Salman Khan) ऐश्वर्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.

काय म्हणाला सलमान खान?

कॉफी विथ करण या शोमध्ये करण जोहरने अभिनेता सलमान खानला (Salman Khan) एक प्रश्न विचारला होता. ऐश्वर्या की कतरिना? त्यावर सलमान खान आधी ऐश्वर्याचं नाव घेतो. नंतर कतरिनाचं नाव घेतो आणि सुंदर असल्याचं सांगतो, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

“अभिषेक बच्चन चांगला व्यक्ती”

सलमानने ऐश्वर्याबाबत वक्तव्य केलं होतं. “तुम्ही ज्या व्यक्तीसोबत असता. त्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असतं मात्र ती व्यक्ती जर तुमच्यासोबत नसेल तर वाईट वाटतं आणि त्रास देखील होतो. यामुळे जुन्या आठवणी विसरलेल्या बरं. त्या गोष्टींना अनेक वर्षे होऊन गेली आहेत. त्याचा सध्या विचार करणं गरजेचं नाही. तसं अभिषेक बच्चन हा चांगला माणुस आहे,” असं सलमान खान म्हणाला होता.

‘हम दिल दे चुके सनम’, या चित्रपटापासून आजही सलमान खान आणि ऐश्वर्याची चर्चा आहे. संजय लिला भन्साळी यांनी हम दिल दे चुके सनम सिनेमाचं दिग्दर्शन केलं. तेव्हा एक किस्सा देखील घडला होता. सिनेमातील एक सीन समजून सांगण्यासाठी तिला स्पर्श केला. तेव्हा सलमान संजय लिला भन्साली यांच्यावर चिडला होता.

New Title – Salman Khan Answer On Aishwarya rai At Coffee With Karan Show

महत्त्वाच्या बातम्या

कंड जिरवेन म्हणणाऱ्या अजित पवारांना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

ट्विटर X च्या माध्यमातून लाखो रुपये कमवता येणार; एलॉन मस्क यांची नवी घोषणा काय?

अजित पवारांचे विश्वासू नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार?;’त्या’ फोटोमागील सत्य समोर

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! भेंडवळची भविष्यवाणी जाहीर; यंदा पाऊस चांगला पडणार

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

 

Join WhatsApp Group

Join Now