पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांची राष्ट्रवादीवर सडकून टीका!

On: November 7, 2024 4:06 PM
Sadabhau Khot
---Advertisement---

Sadabhau Khot l विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच राज्यात एक वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. महायुतीमध्ये असलेल्या सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खरपूस शब्दात टीका केली होती. मात्र त्यावरून महाविकास आघाडीने सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अशातच आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी म्हणजेच सरदारांची आणि लुटारूंची टोळी :

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा लुटारूंची टोळी असल्याचं म्हणाले आहेत. मात्र आता सदाभाऊ खोतांच्या विधानाविरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत.

तसेच राष्ट्रवादी पक्षाचा इतिहास बघितला तर हा पक्ष नाही तर ही सरदारांची आणि लुटारूंची टोळी आहे. कारण लुटारू हे गब्बर सिंगसारखे गावागावात येत असतात. तसेच धाक दाखवून गावगाडा देखील लूटत असतात. तसेच नाही ऐकलं तर त्यांना भरचौकात त्या माणसाला फोडत असतात. मात्र या सगळ्यातून आम्ही देखील गेलो आहोत असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

Sadabhau Khot l खासदार संजय राऊतांना चोख उत्तर :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर बोलताना ‘देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा’ असा उल्लेख केला होता. मात्र त्याला देखील सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊतांना इतकंच सांगेन की, कुत्रा हा इमाने इतबारे त्याच्या धन्याची राखण करत असतं. तसेच ते खाल्लेल्या अण्णाला देखील जागत असतात. मात्र आम्ही आमच्या धन्याची राखण करत आहोत, याचा सार्थ अभिमान असा आहे असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

News Title – Sadabhau Khot On NCP

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंचं शिंदे गटावर खोचक शब्दात टीकास्त्र!

बंडखोरांना दणका! कॉँग्रेसकडून बड्या नेत्याच्या मुलासह ‘या’ बंडखोरांचं निलंबन

संजय राऊत माविआचे xxx, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते…

मुंडे बहीण भावावर प्रवीण महाजनांच्या पत्नीचा अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

‘ज्यांची घरं बुलडोझरने पाडली त्यांना…’; सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला मोठा झटका

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now