अजित पवारांच्या निधनानंतर रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट होतेय तुफान व्हायरल! वाचा सविस्तर

On: January 28, 2026 6:01 PM
ajit pawar and rupali chakankar
---Advertisement---

Rupali Chakankar | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय क्षेत्रासह सामाजिक जीवनातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या दुःखद प्रसंगानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सोशल मीडियावरून भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत आपल्या भावना शब्दांत मांडल्या आहेत.

रुपाली चाकणकरांची भावनिक प्रतिक्रिया :

बारामती (Baramati) येथे विमान अपघातात अजित पवार (Aiit Pawar Death) यांचे निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण राष्ट्रवादी परिवारासह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. काहींनी माध्यमांसमोर भावना व्यक्त केल्या, तर काहींनी मन घट्ट धरून दु:ख स्वीकारण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून भावनांना वाट मोकळी करून दिली.

त्यांनी लिहिले की, राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला असून, दादा नावाच्या नेतृत्वाची सावली हरपल्यामुळे सगळे जण पोरके झाले आहेत. अजित पवार हे प्रत्येकाच्या डोक्यावर मायेचा आधार होते, असे सांगत त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले. काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दादा आपले काम नक्की पूर्ण करतील, हा विश्वास वाटायचा, हीच त्यांची खरी ओळख होती, असेही त्यांनी नमूद केले.

Rupali Chakankar | दादांच्या कार्यशैलीचा भावनिक उल्लेख :

रुपाली चाकणकर यांनी पुढे लिहिले की, अजित पवार जितके स्पष्टपणे बोलायचे, त्यापेक्षा अनेक पटीने त्यांच्या मनात लोकांविषयी आदर आणि आपुलकी असायची. संघटनेच्या कामकाजात ते अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन करत आणि शेवटच्या घटकांपर्यंत पक्ष पोहोचवण्यावर त्यांचा भर होता. महिलांना राजकारणात अधिकाधिक संधी मिळाव्यात, यासाठी ते सातत्याने प्रोत्साहन देत असत, असे त्यांनी अधोरेखित केले.

या घटनेनंतर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, असे सांगत त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी परिवार आज आपल्या आदर्श नेतृत्वाला मुकल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या भावूक शब्दांनी अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. फक्त रुपाली चाकणकरच नव्हे, तर देशभरातील नेतेमंडळींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत पवार कुटुंबाला धीर दिला आहे.

News Title: Rupali Chakankar Reacts to Ajit Pawar Death

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now