आमिर खान पुन्हा एकदा पडला प्रेमात, बंगळुरूच्या ‘मिस्ट्री वुमन’ सोबत करणार तिसरं लग्न?

On: February 1, 2025 2:02 PM
Aamir Khan
---Advertisement---

Aamir Khan | 90 च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा, चार्मिंग व्यक्तिमत्त्वाचा आणि ‘परफेक्शनिस्ट’ (Perfectionist) अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या 40 वर्षांपासून सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या आमिरने एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर (Blockbuster) सिनेमे दिले आहेत.

‘कयामत से कयामत तक’ (Qayamat Se Qayamat Tak), ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti), ‘दिल चाहता है’ (Dil Chahta Hai) यांसारख्या सिनेमांतून त्याने प्रेक्षकांवर छाप पाडली. आमिरचे व्यावसायिक आयुष्य तर सर्वांनाच माहिती आहे, मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल (Amir Khan Personal Life) नेहमीच उत्सुकता राहिली आहे. आमिरचा आधीच दोनदा घटस्फोट (Divorce) झाला असून आता त्याच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

बंगळुरूच्या ‘मिस्ट्री वुमन’ची एन्ट्री

काही मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आयुष्यात एक मिस्ट्री वुमन (Amir Khan Mystery Woman) आली असून ती बंगळुरूची (Bengaluru) आहे. अभिनेत्याच्या निकटवर्तीयाने हा खुलासा केला आहे. सध्या आमिर आपल्या गर्लफ्रेंडबद्दल (Amir Khan Girlfriend) काहीही सांगू इच्छित नाही आणि सर्वांनी त्याच्या खासगी आयुष्याचा  सन्मान करावा अशी त्याची इच्छा आहे. विशेष म्हणजे तो या नात्याबद्दल खूप गंभीर असल्याचेही बोलले जात आहे. त्याने या मिस्ट्री वुमनची भेट आपल्या कुटुंबातील सदस्यांशीही करून दिली असून ही भेट चांगली पार पडल्याची माहिती आहे.

तिसऱ्या लग्नाची चर्चा जोरात

यामुळे आमिर आता तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, एका मुलाखतीत त्याने, “मी आता 59 वर्षांचा आहे. आता या वयात मी कुठे परत लग्न करू. मला तरी अवघड दिसतंय,” असे म्हटले होते. याशिवाय आमिरने तो खऱ्या आयुष्यात रोमँटिक  असल्याचेही वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा कितपत खऱ्या ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आमिरची आधीची लग्न आणि मुलं

1986 साली आमिर खानचे (Aamir Khan) रिना दत्ताशी (Reena Dutta) लग्न झाले होते, ती त्याची बालमैत्रीण होती. लग्नाच्या 16 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2005 साली आमिरने दिग्दर्शिका किरण रावशी (Director Kiran Rao) लग्नगाठ बांधली. ‘लगान’ (Lagaan) च्या सेटवर त्यांची भेट झाली होती. मात्र, किरणसोबतही त्याचा घटस्फोट झाला. त्यांचेही लग्न 16 वर्षे टिकले. आमिर खानला पहिल्या पत्नीपासून आयरा (Ira Khan) आणि जुनैद (Junaid Khan) ही दोन मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला आझाद (Azad Khan) हा मुलगा आहे.

Title : Rumors of Aamir Khan getting married for the third time

Join WhatsApp Group

Join Now