जून महिन्यात ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

On: May 26, 2024 4:57 PM
November Rules Changes
---Advertisement---

Rules change in June | मे महिन्याचा सोमवारी शेवटचा आठवडा सुरू होईल. जून महिना सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक आहेत. पुढील महिन्यात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे नियम आत्ताच जाणून घ्या, अन्यथा तुमच्या खिशाला कात्री लागू शकते.

येत्या 1 जूनपासून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. यासोबतच वाहतुकीच्या नियमातही अनेक बदल होणार आहेत. आता यात अजून कोण-कोणत्या घटकांचा समावेश आहे, याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलीये.

1 जूनपासून ‘या’ नियमांमध्ये बदल होणार

गॅस सिलिंडरच्या दरात बदल : प्रत्येक महिन्याच्या (Rules change in June) पहिल्या दिवशी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतात. याआधी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. व्यावसायिक गॅसदेखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता. आता जूनमध्ये याच्या किमती वाढणार की घटणार ते पाहावं लागेल.

आधार कार्ड बदल : 14 जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येतील. आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील.

वाहतुकीचे नियम : अल्पवयीन मुले गाडी चालवताना दिसल्यास त्यांच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच 25 वर्षांपर्यंत (Rules change in June) लायन्सन्स देण्यात येणार नाहीये.

यासोबतच वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. यापूर्वी यासाठी 1000 रुपये आकारले जात होते. तसंच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

News Title- Rules change in June

महत्वाच्या बातम्या- 

तापमान गेलं चाळीशी पार; शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करा

कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हार्दिक पांड्या; घटस्फोटानंतर नताशाला..

“गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद..”; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा

हृदयद्रावक! गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO समोर

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त?; जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

Join WhatsApp Group

Join Now