Rajkot TRP Game Zone Fire | गुजरातमधील राजकोट येथे गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीये. तर, 10 जणांना वाचवण्यात यश मिळालंय.या ठिकाणी अजूनही काही जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.
या अग्नितांडवात गेमझोन जळून खाक झालाय.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य करण्यात आलं. याठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठाही असल्याची माहिती समोर आलीये.
अग्नितांडवात 32 जणांचा होरपळून मृत्यू
काही मीडिया रिपोर्टनुसार या भीषण आगीत 9 चिमुकल्यांसह 32 जणांचा मृत्यू झालाय. आग लागली त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने येथे 99 रुपयांची स्पेशल ऑफर देखील ठेवण्यात आली होती. मात्र, हा सुट्टीचा आनंदाचा दिवस असा स्मशान शांतता देणारा ठरला.
या ठिकाणी गो कार रेसिंगसाठी 1500 ते 2 हजार लिटर डिझेल आणि 1000 ते 1500 लिटर पेट्रोल गेम झोनमध्ये साठवलं जात असल्याचंही समोर आलंय. त्यात गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि (Rajkot TRP Game Zone Fire) आत जाण्यासाठी 6 ते 7 फुटांचा एकच मार्ग होता. स्पेशल ऑफर असल्याने मोठ्या संख्येनं लोक येथे उपस्थित होते.
राजकोट, गुजरात में एक मॉल के गेमिंग ज़ोन में लगी भयंकर आग से मासूम बच्चों समेत कई लोगों की मृत्यु का समाचार बहुत ही पीड़ादायक है।
सभी शोकाकुल परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं। सभी घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की आशा करता हूं।
कांग्रेस कार्यकर्ताओं से अनुरोध…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2024
गेम झोनच्या मालकसह तिघांना अटक
सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक गेम झोनमधल्या (Rajkot TRP Game Zone Fire) स्टाफनं आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर बाहेर पडण्यासाठी देखील एकच गर्दी झाली होती. अंदाजे तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

अपघाताच्या वेळी ‘गेमिंग झोन’मध्ये किती लोक उपस्थित होते, हे अद्याप कळले नाहीये. या भीषण अग्नीमध्ये मृतांचे मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. या प्रकरणी देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान, राजकोट गेम झोन दुर्घटनेप्रकरणी गेम झोनचा मालक आणि मॅनेजरसह 3 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
News Title- Rajkot TRP Game Zone Fire
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त?; जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर
आज सूर्यदेवाच्या कृपेने ‘या’ 5 राशींना मोठा धनलाभ होणार!
“कुणीतरी लवकरच रस्त्यावर..”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिकच्या बायकोची खळबळजनक पोस्ट
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच नताशाच्या डेटिंगच्या चर्चा; हार्दिक पांड्यापूर्वी कुणाच्या प्रेमात होती?
48 तासांत ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?






