राजस्थान विजयी चौकारासाठी सज्ज, तर बंगळुरूसाठी अस्तित्वाची लढाई; आज मैदानात होणार मोठा राडा!

On: April 10, 2026 12:43 PM
RR vs RCB 2026
---Advertisement---

RR vs RCB 2026 | IPL च्या हंगामात आज दोन अजिंक्य संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि RCB यांच्यातील हा रोमांचक सामना गुवाहाटीतील बारसपरा क्रिकेट स्टेडियम येथे रंगणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केल्यामुळे या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान अव्वल :

या मोसमात राजस्थानने सलग तीन सामने जिंकत 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कर्णधार रियान पराग (Riyan Parag) याच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे रजत पाटीदार (Rajat Patidar) च्या नेतृत्वाखालील आरसीबीनेही सलग दोन सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे RCB चा नेट रनरेट (+2.501) हा राजस्थानपेक्षा अधिक आहे, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर अपेक्षित आहे.

मागील हंगामात RCB ने राजस्थान रॉयल्स विरुद्ध दोन्ही सामने जिंकत वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे यंदा राजस्थान त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विशेषतः घरच्या मैदानासारख्या वातावरणात राजस्थानला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

RR vs RCB 2026 | विराट कोहली ठरणार गेमचेंजर? :

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यांत 97 धावा करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे राजस्थानसमोर कोहलीला रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

राजस्थानच्या यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने मागील सामन्यात दमदार भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली होती. त्यामुळे RCB या जोडीला लवकर बाद करण्यासाठी विशेष रणनिती आखणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. राजस्थानकडे सलग तीन विजयांचा आत्मविश्वास आहे, तर RCB कडे अनुभवी खेळाडूंचा भक्कम आधार आहे. त्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार असून कोणाची विजयी मालिका कायम राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title : RR vs RCB IPL 2026 Match Preview: Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Who Will Win

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now