“…तर अजितदादा तुम्ही आज मुख्यमंत्री असता”

On: May 7, 2024 2:29 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Rohit Pawar | बारामतीमध्ये मतदान पार पडत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीवर लागलेलं असतानाच एक व्हिडीओ सध्या राजकारणात जोरदार व्हायरल होत आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत बारामतीमध्ये मतदारांना मतांसाठी पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर, अजित दादा घाबरले असल्याचंही आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अजितदादांनी भोरमध्ये त्यांच्या गटाच्या नेत्यांनी पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यावर अजित पवार यांनी, आज ते आरोप करत आहेत. तुम्ही स्वत: PDCC बँक उघडी बघितली. जे आरोप करत आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असे वाटते. मी त्याला उत्तर देणार नाही, असं उत्तर दिलं.

त्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी एक्सवर पुन्हा एक पोस्ट करत अजित पवार यांना खोचक टोला लगावला.”अजितदादा माझ्यावर परिणाम झाल्याचा आरोप तुम्ही केला असला तरी काही फरक पडत नाही… पण परिणाम नेमका कुणावर झाला आणि पराभवाच्या भितीने कुणाच्या पायाखालची जमीन सरकली, हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय… आणि म्हणूनच बारामती मतदारसंघात पाण्यासारखा पैसा वाहतोय.”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवारांचे ट्वीट चर्चेत

इतकंच नाही तर, “तुम्ही सात वेळा निवडणूक लढवली पण असले प्रकार केले नसल्याचे सांगता… पण अजितदादा त्यावेळी आजच्या इतकं ‘लक्ष्मी दर्शन’ घडवलं असतं तर राज्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून तुम्ही आज मुख्यमंत्री असता, असं लोकं म्हणतायेत.”, असं रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राजकारणात सध्या बारामतीच्या या व्हिडिओची आणि रोहित पवारांच्या ट्वीटची जोरदार चर्चा होत आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी तर बारामतीमध्ये गैरप्रकार होण्याचीही भीती व्यक्त केली आहे.  बारामती व खडकवासला आणि दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघ हे संवेदनशील म्हणून जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.

बारामतीत मतदारांना पैसे वाटण्यात आले?

या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणताही गैर किंवा अनुसूचित प्रकार घडल्यास सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागेल, त्यामुळे योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा, अशी मागणी सुळे यांनी केलीये. त्यामुळे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

News Title – Rohit Pawar criticism of Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! सुप्रिया सुळे अचानक पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, राजकारणात खळबळ

ड्रेसिंग रूममध्ये जाताच रोहित रडू लागला; चाहत्यांची चिंता वाढली, व्हिडीओ व्हायरल

मोबाईल चोरीला गेल्यास अशाप्रकारे करा Phone Pay, Paytm बंद; अन्यथा बँक खातं होऊ शकतं रिकाम

कोण आहेत त्या 11 जागांवरचे टॉपचे खिलाडी? गड पार करून विजयाची पताका कोण फडकवणार?

…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

Join WhatsApp Group

Join Now