Rohit Pawar | लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून मतदारांना लाखो रुपये वाटण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. याची सुरुवात ही बारामतीपासून झाली. आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान होण्याच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यात आल्याचा आरोप केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत शिंदे यांनी आपल्या सोबत पैशांनी भरलेल्या बॅगा आणल्याचं म्हटलं होतं, अशात रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महायुतीवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांचा धक्कादायक दावा
महायुतीकडून 2000 कोटींचं वाटप केलं जाणार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर, अगदी ॲम्बुलन्स आणि पाण्याच्या टँकरमधूनही पैशांचं वाटप झाल्याचं त्यांनी म्हटलंय. आज (14 मे) रोहित पवार नाशिक दौऱ्यावर असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पेठ या ठिकाणी ते महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
त्यापूर्वी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हे गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीत महायुतीकडून पैशांचा आणि गुंडागिरीचा वापर सुरू आहे. बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला गेला असल्याचं रोहित पवारांनी (Rohit Pawar) म्हटलं आहे.
‘महायुतीकडून 2000 कोटींचं वाटप?’
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नाशिक दौऱ्यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, अगदी दोन तासासाठी 14 बॅग आणि त्याही वजनदार होत्या. त्यामुळे पैशांचा किती मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे हे आपण बघितलं, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.
रोहित पवारांच्या या दाव्यामुळे आता पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. ऐन निवडणुकीत करण्यात आलेल्या अशा आरोपांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. राऊत यांनी लवकरच त्या बॅगांमधील पैसे कुठे-कुठे वाटण्यात आले याचा खुलासा करेल, असं म्हटलंय. त्यामुळे सध्या राज्यात हा पैशांचा मुद्दा चांगलाच रंगला असल्याचं दिसून येतंय.
News Title : Rohit Pawar allegations against mahayuti
महत्त्वाच्या बातम्या-
नवऱ्यासाठी धावून आली अथिया शेट्टी; के.एल. राहुलशी वाद घालणाऱ्या संजय गोयंकांना चांगलंच झापलं?
उर्फी जावेदने केलंय टक्कल?; फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल
उपोषणाबाबत मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा






