“सगळं स्क्रिप्टनुसार”, प्रांजल खेवलकर प्रकरणात महिला आयोगाची उडी; रोहिणी खडसे संतप्त

On: August 6, 2025 3:53 PM
Pranjal Khewalkar
---Advertisement---

Rohini Khadse | प्रांजल खेवलकर प्रकरणात आता एक नवीन वळण आलं आहे. खराडीतील रेव्ह पार्टी प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar)यांना अटक झाल्यापासून राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता महिला आयोगाने उडी घेतली असून, त्यावर रोहिणी खडसे यांनी थेट महिला आयोग आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.

प्रांजल खेवलकरवर अनेक गंभीर आरोप होत आहेत. त्यांच्या मित्रांसोबत काही तरुणी सापडल्याने संशय अधिक गडद झाला आहे. कोर्टाने खेवलकरला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले असून, अजूनही त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाही.

महिला आयोग सक्रिय होताच रोहिणी खडसे आक्रमक :

या प्रकरणात राज्य महिला आयोगाने पोलिसांना पत्र देत संपूर्ण अहवाल मागवला आहे. बीड येथील एका संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रांजल खेवलकरने 28 वेळा स्वतःच्या नावाने हॉटेल बुक केल्याचे म्हटले आहे. तसेच परप्रांतीय मुलींना बोलावल्याचा आरोप करत हे रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Rohini Khadse)

यावर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “ज्या संस्थेने तक्रार केली आहे, ती राष्ट्रवादी (अजित पवार गट) महिला विभागाच्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.” त्यामुळे हा प्रकार हेतुपुरस्सर असल्याचा आरोप त्यांनी केला.

Rohini Khadse | “सगळं स्क्रिप्टनुसार सुरु आहे!” – रोहिणी खडसे :

रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी आणखी दोन मुद्दे उपस्थित करत महिला आयोगावर रोष व्यक्त केला. त्यांच्या मते, राज्यात महिलांवर इतके अत्याचार झाले तरी ही संस्था कधीच पुढे आली नाही. मग आता अचानक ही संस्था का सक्रीय झाली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच त्यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार! सगळं स्क्रिप्टनुसार सुरू आहे.” रोहिणी खडसे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यातील वैयक्तिक आणि राजकीय शाब्दिक चकमक पुन्हा एकदा समोर आली आहे.

News Title: Rohini Khadse Slams Women’s Commission Over Pranjal Khewalkar Case, Calls It a Scripted Attack

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now