Masturbating Effects | आजच्या डिजिटल युगात, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या (Social Media) सहज उपलब्धतेमुळे तरुण पिढीमध्ये लैंगिकतेबद्दल (Sexuality) अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे, हस्तमैथुन ही क्रिया अनेकांना सामान्य किंवा नैसर्गिक वाटू शकते. तथापि, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो, त्याचप्रमाणे अति प्रमाणात हस्तमैथुन (Masturbation) करणे, विशेषतः अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) पाहण्याच्या व्यसनाच्या आहारी जाऊन, शारीरिक (Physical), मानसिक (Mental) आणि भविष्यातील लैंगिक जीवनावर (Life) गंभीर दुष्परिणाम करू शकते.
हस्तमैथुनाची सवय आणि त्याचे व्यसनात रूपांतर
हस्तमैथुन (Masturbation) म्हणजे स्वतःच्या लैंगिक अवयवांना उत्तेजित करून लैंगिक समाधान मिळवण्याची क्रिया. मुलांमध्ये लिंगाला (Penis) स्पर्श करून वीर्यस्खलन करणे आणि मुलींमध्ये (Girls) योनीभोवतीच्या (Vaginal Area) भागाला स्पर्श करून कामोत्तेजना (Climax) अनुभवणे, हे याचे स्वरूप असते. ही क्रिया मर्यादित स्वरूपात करणे कदाचित सामान्य (Normal) मानले जाऊ शकते, परंतु जर ही सवय दररोज, दिवसातून अनेक वेळा किंवा व्यसनासारखी (Addiction) झाली, तर ती गंभीर आरोग्य समस्यांना निमंत्रण देऊ शकते. जर तुम्हाला एकटे असताना कंटाळा आला की हेच करण्याची सवय लागली असेल, किंवा तुम्ही सतत मोबाईलवर (Mobile) अश्लील व्हिडिओ (Pornographic Videos) पाहत असाल, तर ही सवय हळूहळू व्यसनात रूपांतरित होऊन तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम (Impact) करू शकते.
अति हस्तमैथुनाचे शरीरातील ऊर्जा मोठ्या प्रमाणात कमी होते, ज्यामुळे शारीरिक थकवा, अशक्तपणा आणि अंगदुखी यांसारख्या तक्रारी वाढतात. चेहऱ्यावरील तेज (Glow) कमी होऊन डोळ्यांखाली काळी वर्तुळे (Dark Circles) दिसू लागतात. मुलांमध्ये शीघ्रपतन, लिंग ताठरतेमध्ये अडचणी येणे आणि एकूणच संभोगाच्या क्षमतेवर (Ability) विपरीत परिणाम होऊ शकतो. मुलींमध्ये योनीमध्ये जळजळ, खाज (Itching) येणे, हार्मोनल असंतुलन आणि मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) वेळापत्रकात अनियमितता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
या शारीरिक (Physical) परिणामांव्यतिरिक्त , अति हस्तमैथुनाचे मानसिक आणि भावनिक परिणामही (Effects) गंभीर असू शकतात. अनेकांना हस्तमैथुनानंतर अपराधीपणाची (Guilt) भावना येते, “आपण काहीतरी चुकीचे करत आहोत” असे वाटू लागते, ज्यामुळे आत्मविश्वास (Self-confidence) कमी होतो आणि एकलकोंडेपणा वाढतो. सतत अश्लील कंटेंट पाहिल्याने स्त्री (Woman) किंवा पुरुषाकडे पाहण्याचा दृष्टिकोन (Perspective) विकृत होऊ शकतो आणि नात्यांमध्ये लैंगिकता हेच सर्वस्व आहे, असा चुकीचा भ्रम निर्माण होऊ शकतो. यामुळे मेंदू (Brain) सतत लैंगिक विचारांनी व्यापलेला राहतो, एकाग्रता कमी होते, अभ्यासात (Studies) किंवा कामात रस राहत नाही, आणि याचा थेट परिणाम करिअर आणि भविष्यावर होतो. भविष्यात, विशेषतः मुलांमध्ये (Boys) शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होणे, तर मुलींमध्ये हार्मोनल बदलांमुळे PCOD/PCOS सारख्या समस्या उद्भवून मूल होण्यातही अडचणी येऊ शकतात. आयुर्वेदानुसारही वीर्य हे ऊर्जा आणि तेजाचा स्रोत असून, “ब्रह्मचर्येण तेजो लभते” म्हणजेच संयमाने तेज प्राप्त होते, असे सांगितले आहे. त्यामुळे, शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन राखण्यासाठी संयम आवश्यक आहे.
या सवयीपासून मुक्त होण्याचे उपाय
अति हस्तमैथुनाच्या सवयीपासून मुक्त होण्यासाठी काही उपाययोजना करणे शक्य आहे. मोबाईलचा वापर नियंत्रित करा, अश्लील ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करा. आपल्या दिवसाचे योग्य नियोजन करून वाचन , व्यायाम, कला, मित्र-मैत्रिणींशी संवाद आणि अभ्यासात स्वतःला गुंतवून घ्या. मोकळा वेळ एकटेपणात घालवणे टाळा. नियमित व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान केल्याने मन आणि शरीरावर ताबा मिळवण्यास मदत होते. विशेषतः ब्रह्मचर्य टिकवण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत.
जर तुम्हाला ही सवय नियंत्रणात आणणे कठीण वाटत असेल, तर कोणताही संकोच न बाळगता तज्ञ, समुपदेशक किंवा विश्वासू व्यक्तीशी बोला आणि योग्य मार्गदर्शन घ्या. हस्तमैथुन ही सुरुवातीला तात्पुरती मजा वाटू शकते, परंतु त्याचे व्यसनात रूपांतर झाल्यास होणारे दुष्परिणाम गंभीर आहेत. त्यामुळे, वेळीच सावध होऊन, स्वतःवर प्रेम (Self-love) करा, संयम ठेवा आणि निरोगी जीवनाचा मार्ग निवडा.
Title : Excessive masturbation is harmful to the body






