Rinku Singh | आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघातून मोठी बातमी समोर आली आहे. विस्फोटक फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) याला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. Kolkata Knight Riders ने 19 व्या हंगामाआधी ही महत्त्वाची घोषणा केली असून संघ व्यवस्थापनाने रिंकूवर मोठा विश्वास दाखवला आहे.
Indian Premier League चा 19 वा हंगाम 28 मार्चपासून सुरू होणार असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केकेआरने नेतृत्व गटात बदल करत रिंकू सिंहला उपकर्णधार बनवले आहे. तर संघाची कर्णधारपदाची धुरा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर असणार आहे.
संघर्षातून उभा राहिलेला रिंकू : :
रिंकू सिंहसाठी हे आयपीएलमधील आठवे वर्ष असणार आहे. त्याने 2018 साली केकेआरकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत आणि कामगिरीही साधारणच राहिली. मात्र त्याने हार न मानता सातत्याने मेहनत घेतली आणि हळूहळू संघातील महत्त्वाचा खेळाडू बनला. (Rinku Singh KKR Vice Captain)
आज रिंकू सिंह केकेआरच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक मानला जातो. विशेषतः सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये संघाला विजय मिळवून देणारा विश्वासू फिनिशर म्हणून त्याची ओळख तयार झाली आहे. त्यामुळेच व्यवस्थापनाने त्याला उपकर्णधारपदाची मोठी जबाबदारी दिली आहे.
Rinku Singh | आयपीएलमधील रिंकूची कामगिरी :
आतापर्यंत रिंकू सिंहने आयपीएलमध्ये 51 डावांत फलंदाजी करत सुमारे 1000 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी सुमारे 30.52 असून स्ट्राईक रेट 145 च्या आसपास आहे. आयपीएल कारकीर्दीत त्याने 4 अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 56 षटकार आणि 87 चौकारांची नोंद आहे. (Rinku Singh KKR Vice Captain)
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांत रिंकूसाठी परिस्थिती थोडी कठीण होती. त्याने नुकतेच आपल्या वडिलांना गमावले असून आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेतही त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र तरीही केकेआर व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएल हंगामात रिंकू सिंहसमोर हा विश्वास सार्थ ठरवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.






