हार्दिक-कृणालमध्ये दुरावा? ‘तिच्या’ एन्ट्रीने पांड्या ब्रदर्समध्ये ठिणगी; पांड्याच्या आयुष्यात पुन्हा नवं वादळ?

On: March 11, 2026 7:41 PM
Hardik Pandya
---Advertisement---

Hardik Pandya | टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर देशभरात भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मोठा विजय मिळवत भारताने सलग दुसरा आणि एकूण तिसरा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला. मात्र या मोठ्या यशाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिक आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत.

वर्ल्ड कप विजयानंतर अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर टीम इंडियाचं अभिनंदन केलं. मात्र हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याने या विजयाबद्दल कोणतीही पोस्ट केलेली दिसली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय कृणालची पत्नी पंखुडी शर्मा हिनेही या विजयाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे.

वर्ल्ड कपदरम्यान कृणाल-पंखुडी दिसलेच नाहीत :

संपूर्ण टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Mahika sharma) अनेक ठिकाणी त्याच्यासोबत दिसली. स्टेडियममध्ये सामने पाहताना तसेच विविध कार्यक्रमांमध्येही ती हार्दिकसोबत उपस्थित होती. मात्र याच काळात कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडी कुठेही दिसून आले नाहीत. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

काही सोशल मीडिया यूजर्सच्या मते, माहिका शर्माच्या एन्ट्रीनंतर पांड्या बंधूंमध्ये अंतर निर्माण झालं आहे का, असा सवाल विचारला जात आहे. मात्र या सर्व चर्चांबाबत हार्दिक किंवा कृणाल पांड्या यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

Hardik Pandya | सोशल मीडियावर चर्चा रंगल्या :

टीम इंडियाच्या विजयानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू केल्या आहेत. हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पांड्या कुटुंबात काही तणाव निर्माण झाला आहे का, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र यामागचं खरं कारण काय आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) कौतुक होत असतानाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुरू झालेल्या या चर्चांनी पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

News Title: Rift Between Hardik Pandya and Krunal Pandya? Mahika Sharma’s Entry Sparks Buzz After T20 World Cup Win

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now