Rewa Fraud Case | रीवा (Rewa) शहरातील एका युवकाच्या प्रेमप्रकरणाने मोठी वळणे घेतली असून, त्याला ८० लाख रुपयांचा फसवणुकीचा फटका बसला आहे. आजाद नगरमध्ये राहणाऱ्या विवेक शुक्ला (Vivek Shukla) याने आपल्या प्रेमिका आस्था उर्मलिया (Aastha Urmaliya) हिच्यावर मनमोकळेपणाने पैसा खर्च केला. तिने तीन वर्षे सहा महिने विवाहाचे आश्वासन दिले आणि या काळात महागड्या वस्तूंची खरेदी केली. मात्र, अखेरीस तिने आपल्या जुन्या प्रियकराशी साखरपुडा करून विवेकला धक्का दिला. (Rewa Fraud Case)
३ वर्षे ६ महिने फसवणूक; प्रेमिकेवर गुन्हा दाखल
विवेक आणि आस्थामध्ये पहिल्यांदा मैत्री झाली आणि नंतर हे नाते प्रेमात बदलले. आस्थाने सतत विवेकला लग्नाचे वचन दिले आणि त्याच्या पैशाचा मनमुराद वापर केला.
महागड्या हॉटेल्समध्ये डिनरपासून ते डायमंड रिंग, आयफोन, ब्रँडेड घड्याळ, हँडबॅग, चष्मे आणि कपडे यांसाठी विवेकने मोठी रक्कम खर्च केली. विशेष म्हणजे, आस्थाने केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आपल्या बहिणीसाठीही लाखोंची खरेदी केली. ऑनलाईन शॉपिंग करताना सर्व पेमेंट विवेक करत असे.
मात्र, काही दिवसांपूर्वी आस्थाने अचानक आपल्या जुन्या प्रियकराशी साखरपुडा केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर विवेकला फसवणुकीची जाणीव झाली आणि त्याने पोलिसांत धाव घेतली. (Rewa Fraud Case)
राजकीय कुटुंबाशी संबंध
आस्था उर्मलिया ही एका राजकीय कुटुंबातील असून ती माजी आमदार राजकुमार उर्मलिया (Rajkumar Urmaliya) यांची भाची आहे. तसेच, तिचे वडील पूर्वी जनपद अध्यक्ष होते. त्यामुळे तिच्या कुटुंबाचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे.
विवेकने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर, कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आस्थाविरोधात फसवणुकीसाठी भा.दं.वि. ४२० (धोखाधडीचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर पोलिस अधीक्षक ऋतु उपाध्याय (Ritu Upadhyay) यांनी सांगितले की, आस्थाने लग्नाचे आमिष दाखवून मोठी फसवणूक केली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
Title: Rewa Fraud Case Lover Scammed 80 Lakh Girlfriend Flees








