या दोन मोठ्या बँकांना RBI ने दिला दणका; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

On: September 11, 2024 2:32 PM
Safe Banks
---Advertisement---

RBI l रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने देशातील दोन आघाडीच्या बँकांना दणका दिला आहे. यामध्ये ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचा समावेश आहे. RBI ने या दोन्ही बँकांना एकूण 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल आणि ठेवींवरील व्याजदर, KYC आणि शेतीशी संबंधित नियमांचे पालन न केल्यामुळे ॲक्सिस बँकेला 1.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे RBI ने म्हटले आहे.

HDFC बँकेला एक कोटी रुपयांचा दंड :

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला ठेवींवरील व्याजदर, बँकांनी नियुक्त केलेले रिकव्हरी एजंट आणि बँकांमध्ये ग्राहक सेवेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्याबद्दल १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँका आणि एजंट्समधील ग्राहक सेवेशी संबंधित सूचनांचे पालन न केल्यामुळे 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

31 मार्च 2023 पर्यंत बँकेच्या आर्थिक स्थितीचे पुनरावलोकन करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने केलेल्या ॲक्सिस बँकेच्या पर्यवेक्षी मूल्यांकनात अनेक अनुपालन समस्या उघड झाल्या आहेत. तसेच त्यासाठी पात्र नसलेल्या संस्थांसाठी बँकेने बचत खाती उघडली होती. बँकेने सिंगल युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड (UCIC) ऐवजी अनेक ग्राहक ओळख कोड जारी केले होते आणि काही प्रकरणांमध्ये 1.60 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी तारण स्वीकारले होते.

RBI l ग्राहकांवर काऊ परिणाम होणार? :

रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेवर सरावात जास्त दंड ठोठावला आहे, जो 1.91 कोटी रुपये आहे. बँकेने ठेवींवरील व्याजदर, केवायसीसह कृषी कर्जाशी संबंधित काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेला हा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँकेवर लावण्यात आलेल्या दंडाच्या माहितीसोबतच, बँकांच्या ग्राहकांवर याचा काय परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. यामुळे बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम होणार नाही.

News Title : Reserve Bank of India action on hdfc and axis bank

महत्वाच्या बातम्या-

भारीच! ह्युंदाईच्या ‘या’ नवीन कारचे दरवाजे तुमच्या फोनने होणार अनलॉक

सर्वात मोठी बातमी! मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, मटन अन् ..; संजय राऊतांनी हिंदुत्वावरून सुनावलं

कुठे अतिवृष्टी तर कुठे विश्रांती; राज्यात आज कसं राहील हवामान?

अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now