सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर; गॅस सिलेंडरच्या दरात कपात

On: February 1, 2025 11:01 AM
LPG Strike Warning
---Advertisement---

LPG Prices | आज देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे. मागील दोन महिन्यांतील दर कपातीचा विचार करता व्यावसायिक गॅस सिलिंडर २० रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाले आहेत. (LPG Prices)

देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७ रुपयांची घट झाली असून, आता १९ किलोचा सिलिंडर १७९७ रुपयांना मिळत आहे. कोलकाता शहरात ४ रुपयांची कपात झाली असून, तेथे व्यावसायिक गॅस सिलिंडर १९०७ रुपयांना मिळेल. मुंबई आणि चेन्नई या शहरांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६.५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत १७४९.५० रुपये आणि चेन्नईत १९५९.५० रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत आहे.

दोन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडर २१.५ रुपयांपर्यंत स्वस्त

मागील दोन महिन्यांचा विचार केल्यास दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर २१.५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर कोलकाता शहरात २० रुपये आणि चेन्नईत २१ रुपयांची घसरण झाली आहे. ही दर कपात फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या बाबतीत लागू आहे. घरगुती गॅसचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

व्यावसायिक गॅसचा वापर करणारे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते यांना या दर कपातीमुळे दिलासा मिळाला आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर सातत्याने कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दर स्थिर राहतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (LPG Prices)

घरगुती गॅसधारकांना दिलासा

घरगुती गॅसधारकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या महिन्यातही दरात कोणताही बदल झालेला नाही. मागील काही महिन्यांपासून घरगुती गॅसच्या दरात वाढ झालेली नाही. १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर मागील महिन्यातील दरावरच मिळत आहे. दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये तर चेन्नईत ८१८.५० रुपये या दराने घरगुती गॅस मिळत आहे. (LPG Prices)

Title : Relief For Consumers as Domestic LPG Prices  Remain Unchanged Commercial LPG Prices Reduced

 

Join WhatsApp Group

Join Now