रीलस्टार विक्की पाटील हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; पत्नीचा खळबळजनक आरोप

On: March 1, 2025 4:31 PM
Reelstar Vicky Patil Murder Wife Accuses Uncle 
---Advertisement---

Vicky Patil Murder | जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे प्रसिद्ध रीलस्टार विक्की पाटील (Vicky Patil Murder) याच्या हत्येची धक्कादायक घटना घडली. विक्कीच्या वडिलांनीच त्याची हत्या करून आत्महत्या केल्याचे समोर आले होते, पण आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. विक्कीच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पत्नीचा खळबळजनक आरोप

विक्की पाटीलच्या (Vicky Patil) पत्नीने असा दावा केला आहे की, “माझ्या सासऱ्यांना (Father-in-law) शर्टाचे बटणही लावता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी माझ्या पतीची हत्या केलेली नाही. माझ्या पतीची हत्या सासऱ्यांनी नाही, तर त्यांच्या काकांनी केली आहे.” या आरोपामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

दुसरीकडे, विक्की पाटीलच्या (Vicky Patil) आईने मात्र आपल्या पतीनेच मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, या हत्याकांडाचा तपास करणे पोलिसांसमोर (Police) मोठे आव्हान बनले आहे. माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील (Vitthal Patil) यांनी आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून घेतला, पण यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आईचे म्हणणे

मुलगा विक्की पाटील (Vicky Patil Murder) दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे विठ्ठल पाटील (Vitthal Patil) यांनी त्याची हत्या केली आणि नंतर स्वतःचे जीवन संपवले, असे विठ्ठल यांच्या पत्नी आणि विक्कीची आई संगीता पाटील यांनी सांगितले आहे. सततच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.

आता या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांना (Police) अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. विक्कीच्या पत्नीने केलेले आरोप, आईने दिलेली माहिती आणि इतर पुरावे यांच्या आधारे सत्य काय आहे हे शोधावे लागेल.

Title : Reelstar Vicky Patil Murder Wife Accuses Uncle 

 

Join WhatsApp Group

Join Now