रील स्टार पोराची हत्या करत वडिलांची आत्महत्या; चिठ्ठीत केला धक्कादायक खुलासा

On: February 28, 2025 5:06 PM
Reel Star Murder Son Killed by Father in Jalgaon Father Commits Suicide
---Advertisement---

Reel Star Murder | जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका मुलाची त्याच्याच वडिलांनी आणि काकांनी मिळून हत्या केली. दारूच्या नशेत वारंवार होणाऱ्या मारहाणीला कंटाळून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (Reel Star Murder)

वडिलांची आत्महत्या आणि धक्कादायक खुलासा

वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर, स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुलाच्या हत्येची कबुली दिली आणि मृतदेह पुरल्याची जागाही सांगितली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माजी सैनिक (Ex-Serviceman) असलेले विठ्ठल पाटील (Vitthal Patil) एरंडोल येथे पत्नी, सून आणि मुलगा विकीसोबत (Vicky Patil) राहत होते. विकी सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता, पण त्याला दारूचे व्यसन जडले होते. दारूच्या नशेत तो वडिलांना मारहाण करत असल्याने कुटुंबीय त्रस्त झाले होते.

25 फेब्रुवारीला विकीने दारू पिऊन वडिलांना मारहाण केली. त्यानंतर विठ्ठल पाटील यांनी आपल्या भावाच्या मदतीने विकीची गळा आवळून हत्या केली. त्याचा मृतदेह गावाजवळील धरणाजवळ पुरला. मुलाच्या हत्येनंतर अस्वस्थ झालेल्या विठ्ठल पाटील यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीमुळे तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी (Police) तपास करून धरणाजवळ पुरलेला विकीचा मृतदेह ताब्यात घेतला.

हत्येमध्ये सहभाग आणि अटक

प्राथमिक तपासात विकीची हत्या विठ्ठल पाटील, त्यांचे भाऊ आणि जेसीबी चालकाने मिळून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

विठ्ठल पाटील यांच्या पत्नी संगीता पाटील (Sangeeta Patil) यांनी, विकीच्या त्रासाला कंटाळून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले. तर, विकीची पत्नी पायलने (Payal) सासऱ्यांच्या हत्येच्या दाव्यावर संशय व्यक्त केला आहे. सासऱ्यांना शर्टाची बटणेही लावता येत नव्हती, त्यामुळे त्यांनी हत्या केली यावर विश्वास बसत नाही, असे पायलने म्हटले. तिने चुलत सासऱ्यांच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला असून पतीला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. (Reel Star Murder)

Title : Reel Star Murder Son Killed by Father in Jalgaon Father Commits Suicide

 

Join WhatsApp Group

Join Now