खाऱ्या पाण्याने केस गळतात? तर ‘या’ 2 गोष्टी नक्की ट्राय करा!

On: August 15, 2026 7:20 PM
Hair Care Tips
---Advertisement---

Hair Care Tips | खाऱ्या किंवा हार्ड वॉटरच्या (Hard Water) सतत वापरामुळे केस कोरडे, निस्तेज आणि कमकुवत होऊ शकतात. पाण्यातील सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारख्या घटकांचा परिणाम टाळूवरही होतो. त्यामुळे कोंडा वाढणे आणि केसगळतीची समस्या जाणवू शकते. केसांची योग्य काळजी घेतल्यास खाऱ्या पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

उकळलेले पाणी आणि दह्याचा हेअर मास्क ठरेल उपयोगी :

हार्ड वॉटरमुळे केसांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी केस धुताना उकळून पूर्णपणे थंड केलेले पाणी वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाणी उकळल्यानंतर ते गरम असतानाच केसांवर ओतायचे नाही. ते व्यवस्थित थंड झाल्यावरच केस धुण्यासाठी वापरावे. अशा प्रकारे पाण्याचा वापर केल्याने केसांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होऊ शकते आणि केस अधिक मऊ व चमकदार दिसू शकतात.

केसांची निगा राखण्यासाठी दह्यापासून तयार केलेला हेअर मास्कही वापरता येतो. खाऱ्या पाण्यामुळे खराब झालेले किंवा कोरडे झालेले केस असल्यास आठवड्यातून एक ते दोन वेळा हा मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. ताज्या दह्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) मिसळून हा मास्क तयार करता येतो. तयार मिश्रण केसांसह टाळूवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. साधारण 45 मिनिटे हा मास्क ठेवून त्यानंतर साध्या पाण्याने किंवा माइल्ड शॅम्पूने केस धुवावेत. हा मास्क केसांना मॉइश्चर देण्यास मदत करू शकतो.

Hair Care Tips | तेल आणि योग्य आहारातून केसांना मिळेल आधार :

खाऱ्या पाण्याच्या सतत संपर्कामुळे केसांमधील कोरडेपणा वाढू शकतो. त्यामुळे केसांची बाहेरून काळजी घेताना तेल लावण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आवळा, ब्राह्मी आणि बदामाचे तेल वापरून आठवड्यातून किमान दोन वेळा टाळूची मालिश करण्याचा उपाय सांगितला आहे. नियमित तेलमालिश केल्याने कोरड्या टाळूची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी फक्त बाह्य उपचारांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. आहारातून मिळणारे पोषक घटकही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे रोजच्या आहारात अक्रोड, जवस आणि तीळ यांसारख्या नट्स व सीड्सचा समावेश करावा. यामधून मिळणारे प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण देऊन त्यांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. मात्र, केसगळतीची समस्या सातत्याने होत असल्यास या उपायांचे अनुकरण करण्यापूर्वी डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या माहितीचे उद्दिष्ट सामान्य माहिती देणे असून, उपचारांचा निश्चित पर्याय म्हणून याकडे पाहू नये.

News title : Reduce Hair Fall From Hard Water

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now