Redmi A5 4G | Xiaomiच्या सब-ब्रँड Redmi ने आपला नवा बजेट स्मार्टफोन रेडमी A5 4G लाँच केला आहे. अधिकृत लॉन्चिंगपूर्वीच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. Unisoc T7250 चिपसेट आणि 6.88-इंच LCD डिस्प्लेसह हा स्मार्टफोन येतो. जाणून घ्या याची किंमत आणि खास फीचर्स.
किंमत काय?
काही मीडिया रिपोर्टनुसार, Redmi A5 4G चा 4GB रॅम + 64GB स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट BDT 10,999 (सुमारे 7,855) मध्ये उपलब्ध आहे. तर, 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत BDT 12,999 (सुमारे 9,283) आहे. हा फोन ब्लॅक, बेज, ब्लू आणि ग्रीन या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi A5 4G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
- डिस्प्ले: 6.88-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट
- प्रोसेसर: Unisoc T7250 चिपसेट
- कॅमेरा: 32MP AI रियर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा
- बॅटरी: 5,200mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट (बॉक्समध्ये 15W चार्जर)
- डिझाइन: AG फ्रॉस्टेड ग्लास बॅक, साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर
भारतामध्ये POCO C71 नावाने होऊ शकतो लॉन्च
हा फोन भारतात आणि इतर बाजारपेठांमध्ये POCO C71 नावाने लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. याची किंमत 10,000 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, POCO कडून यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.
Title : Redmi A5 4G Best Budget Smartphone Under 8000






