सनरायझर्स हैदराबाद की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू! सलामीच्या सामन्यात कोणाचे पारडे जड? वाचा सविस्तर

On: March 27, 2026 8:55 PM
RCB vs SRH (1)
---Advertisement---

RCB vs SRH | इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या हंगामाची सुरुवात अत्यंत रोमांचक सामन्याने होत आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे. दोन्ही संघातील दमदार खेळाडूंमुळे हा मुकाबला चुरशीचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही संघांची ताकद आणि मागील निकाल :

आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने येत आहेत. हा सामना बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium) येथे खेळवला जात आहे. हे मैदान आरसीबीचे होमग्राउंड असल्याने स्थानिक चाहत्यांचा मोठा पाठिंबा संघाला मिळण्याची शक्यता आहे. मात्र संघरचनेचा विचार केला तर सनरायझर्स हैदराबादचा संघ तुलनेने मजबूत मानला जात आहे.

आरसीबी (RCB) संघाला या सामन्यात काही महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार आहे. विशेषतः जोश हेझलवूड (Josh Hazlewood) उपलब्ध नसल्याने गोलंदाजी विभागावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे यश दयाल (Yash Dayal) देखील या सामन्यात खेळत नसल्याचे सांगितले जात आहे. मागील आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा 42 धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) ने तुफानी फलंदाजी करत 5 षटकारांसह 94 धावा केल्या होत्या. तसेच अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने अवघ्या 17 चेंडूत 34 धावांची जलद खेळी साकारली होती. त्या सामन्यात हैदराबादने 20 षटकांत 231 धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि आरसीबीला 189 धावांवर रोखत विजय मिळवला.

RCB vs SRH | आकडेवारीत हैदराबाद आघाडीवर :

दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड आकडेवारीकडे पाहिल्यास सनरायझर्स हैदराबादचा वरचष्मा दिसून येतो. आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 25 सामने खेळले गेले असून त्यापैकी 14 सामने हैदराबादने जिंकले आहेत, तर 11 वेळा आरसीबीला विजय मिळाला आहे. आयपीएल 2026 मध्ये हे दोन्ही संघ दोनदा भिडणार आहेत. पहिला सामना 28 मार्च रोजी तर दुसरा सामना 22 मे रोजी खेळवला जाणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व यंदा इशान किशनकडे सोपवण्यात आले आहे. पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने ही जबाबदारी त्याच्याकडे आली आहे. सध्या इशान किशन उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याची फलंदाजी टी20 विश्वचषक 2026 मध्येही पाहायला मिळाली होती. दुसरीकडे आरसीबीकडून विराट कोहली (Virat Kohli) कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने 24 सामन्यांत तब्बल 805 धावा केल्या आहेत.

या दोन संघांमधील सर्वात मोठ्या वैयक्तिक खेळीचा विक्रम जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्या नावावर आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 56 चेंडूत 114 धावांची विस्फोटक खेळी केली होती. तसेच डेविड वॉर्नर (David Warner) याने हैदराबादकडून खेळताना आरसीबीविरुद्ध सर्वाधिक 33 षटकार ठोकले आहेत. या प्रतिस्पर्ध्यात एकदा आरसीबीचा संघ केवळ 68 धावांवर बाद झाल्याची नोंदही आहे. त्यामुळे या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

News title : RCB vs SRH IPL Opener

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now