RBI ने UPI व्यवहारांच्या नियमात केला मोठा बदल; तुमचे पैसे राहणार सुरक्षित

On: April 13, 2026 7:42 PM
RBI UPI Rules
---Advertisement---

RBI UPI Rules | देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर Reserve Bank of India (RBI) मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी UPI व्यवहारांमध्ये ‘कूलिंग-ऑफ’ कालावधी लागू करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यामुळे मोठ्या व्यवहारांमध्ये तात्काळ पैसे ट्रान्सफर न होता काही काळासाठी होल्डवर ठेवले जातील.

काय आहे ‘कूलिंग-ऑफ’ नियम? :

या प्रस्तावानुसार ₹10,000 पेक्षा जास्त रकमेचे UPI व्यवहार सुमारे 1 तासासाठी होल्ड ठेवले जाऊ शकतात. या कालावधीत ग्राहकांना व्यवहार रद्द करण्याची संधी मिळेल. त्यामुळे चुकीचा किंवा फसवणुकीतून झालेला व्यवहार थांबवणे शक्य होईल.

विशेष म्हणजे, Reserve Bank of India च्या पेमेंट आणि सेटलमेंट विभागाने यासंदर्भात चर्चापत्र सादर केले असून, डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी चार पर्याय सुचवले आहेत.

RBI UPI Rules | का गरजेचा आहे हा बदल? :

आकडेवारीनुसार, ऑनलाइन फसवणुकीत मोठी वाढ झाली आहे. ₹10,000 पेक्षा जास्त व्यवहार हे एकूण व्यवहारांपैकी सुमारे 45% असले तरी, फसवणुकीच्या 98.5% प्रकरणांमध्ये याच व्यवहारांचा समावेश आहे.

यामागे मुख्य कारण म्हणजे ‘Authorized Push Payment Fraud’, ज्यामध्ये फसवणूक करणारे स्वतःला बँक अधिकारी किंवा सरकारी प्रतिनिधी म्हणून भासवून लोकांकडून पैसे ट्रान्सफर करून घेतात.

ग्राहकांसाठी आणखी काय सुविधा? :

– संशयास्पद व्यवहारांवर बँक ग्राहकाकडून पुन्हा पुष्टीकरण घेईल.
– ‘व्हाईटलिस्ट’ फीचरमुळे विश्वासू खात्यांमध्ये व्यवहार त्वरित होऊ शकतील.
– नियमित व्यापारी पेमेंट, ई-मँडेट्स आणि NACH व्यवहारांना सूट दिली जाईल.

या नव्या नियमामुळे ग्राहकांना व्यवहार करण्याआधी विचार करण्यासाठी वेळ मिळेल. त्यामुळे घाईघाईत किंवा दबावाखाली केलेले व्यवहार टाळता येतील आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होईल.

News Title: RBI Proposes 1-Hour Cooling Period for UPI Transactions to Prevent Online Fraud

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now