Ravi Rana l विधानसभा निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघातून अभिजीत अडसूळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता दर्यापूर मतदारसंघात चांगलाच धुराळा उडणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र आता शिवसेना उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांनी रणनीती देखील आखायला सुरुवात केली असल्याची चर्चा रंगली आहे
रमेश बुंदीले युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार? :
विधानसभा निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघात रवी राणा वेगळा गेम खेळण्याची चिन्हं सुसाट आहेत. त्यामुळे दर्यापुरात महायुतीच्या उमेदवाराला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय रमेश बुंदीले यांना अद्याप उमेदवारी देण्याचा निर्णय देखील झालेला नाही.
याशिवाय आता माजी आमदार रमेश बुंदीले हे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. विशेष म्हणजे महायुतीत असतानाही आमदार रवी राणा हे माजी आमदार रमेश बुंदिले यांना अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ravi Rana l आमदाराने लोकांच्या न्यायासाठी लढलं पाहिजे :
यावेळी रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रमेश बुंदीले यांना अद्याप उमेदवारी देण्याचा निर्णय देखील देखील झालेला नाही. मात्र त्यांचा अजून पक्षप्रवेश होत आहे. याबाबत ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहेत. मात्र आता सध्या अडसूळांचा प्रचार करणं हे योग्य नाही.
कारण त्यांनी आमदारकी भोगली आहे. ते 2-2 वर्षे मतदारसंघात पाऊल देखील ठेवत नाहीत. तर आमदाराने लोकांच्या न्यायासाठी लढलं पाहिजे. असा उमेदवार दर्यापूरात पाहिजे का? असं सूचक वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.
News Title : Ravi rana aginst on abhijeet adsul
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंनी ‘या’ 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म!
शर्मिला ठाकरेंनी ओवाळणीत मागितली चक्क ‘आमदारकी’; नेमकं काय घडलं
’63 वर्षीय अभिनेत्यासोबत सेक्स सीन करताना त्यांनी मला…’; मल्लिका शेरावतकडून मोठा खुलासा






