रश्मिका-विजयला ६० कोटींची ऑफर; नेमकं प्रकरण काय?

On: February 16, 2026 1:14 PM
Rashmika Mandanna
---Advertisement---

Rashmika Mandanna | दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय ठरलेली जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याबाबत नव्या तारखा समोर येत असतानाच एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून कोट्यवधींची ऑफर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. या सर्व घडामोडीमागील नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

शाही लग्नाची तयारी आणि 60 कोटींची ऑफर? :

गेल्या वर्षाच्या अखेरीपासूनच या दोघांच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला 2 फेब्रुवारी रोजी ते विवाहबंधनात अडकणार असल्याचे म्हटले गेले, मात्र त्या बातम्या नंतर अफवा ठरल्या. आता 26 फेब्रुवारी ही नवीन तारीख पुढे येत आहे. फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य समारंभ पार पडेल, अशी माहिती मिळत आहे. विशेषतः सिटी पॅलेसमध्ये हा सोहळा आयोजित केला जाईल, अशी चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओचे डिजिटल हक्क मिळवण्यासाठी तब्बल 60 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. दोघेही साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना ‘पॉवर कपल’ मानले जाते. रश्मिकाने ‘छावा’ आणि ‘अॅनिमल’सारख्या चित्रपटांतून हिंदी प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली, तर विजयला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळे त्यांच्या विवाहाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे आणि डिजिटल हक्कांसाठी स्पर्धा असणे स्वाभाविक मानले जात आहे.

Rashmika Mandanna | अफवांवर पडदा, अधिकृत करार नाही :

दरम्यान, संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मकडून अशी कोणतीही अधिकृत ऑफर दिली नसल्याची माहिती समोर येत आहे. ऑक्टोबर महिन्यात दोघांनी अत्यंत खासगी पद्धतीने साखरपुडा केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत दोघेही नेहमीच गोपनीयता राखताना दिसतात. त्यामुळे लग्नाविषयीचे तपशील देखील मर्यादित लोकांपर्यंतच ठेवले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तरी कोणताही करार झालेला नाही किंवा डिजिटल हक्कांसाठी अधिकृत चर्चा झालेली नाही. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ या चित्रपटांत एकत्र काम करताना त्यांची जवळीक वाढली. मात्र त्यांच्या नात्याविषयी त्यांनी कधीही सार्वजनिकरित्या स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. तरीसुद्धा, लग्न आणि 60 कोटींच्या ऑफरची चर्चा चाहत्यांमध्ये जोर धरत आहे.

News title : Rashmika Vijay Wedding Netflix Offer Buzz

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now