‘छावा’ चित्रपटासाठी रश्मिका मंदाना नव्हती पहिली पसंती; ‘या’ अभिनेत्रीचा झाला होता विचार

On: February 22, 2025 4:47 PM
Rashmika Mandanna
---Advertisement---

Chhava | सध्या देशभरात ‘छावा’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. सर्वत्र चित्रपटाचे कौतुक होत असून, महाराष्ट्रात तर चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. आतापर्यंत चित्रपटाने 240 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) चित्रपटाची घोडदौड सुरू आहे.

हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित आहे. चित्रपटात संभाजी महाराजांची (Sambhaji Maharaj) भूमिका अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) साकारली आहे, तर महाराणी येसूबाईंची (Maharani Yesubai) भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) साकारली आहे.

रश्मिकाच्या (Rashmika) कामाचे कौतुक

रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) साकारलेल्या महाराणी येसूबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने या पात्राला न्याय दिला आहे, असे म्हटले जात आहे.

कतरिना कैफचा (Katrina Kaif) झाला होता विचार

महाराणी येसूबाईंच्या (Maharani Yesubai) भूमिकेसाठी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif) विचार करण्यात आला होता. तशी विचारणाही तिला झाली होती, परंतु काही कारणांमुळे ती ही भूमिका साकारू शकली नाही आणि ही भूमिका रश्मिका मंदानाला (Rashmika Mandanna) मिळाली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिकेसाठी विकी कौशलच्या (Vicky Kaushal) आधी महेश बाबूचा (Mahesh Babu) विचार करण्यात आला होता. परंतु, महेश बाबूनेही (Mahesh Babu) ही भूमिका साकारण्यात स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका विकी कौशलकडे (Vicky Kaushal) आली.

Title : Rashmika Mandanna Was Not the First Choice for  Chhava 

 

Join WhatsApp Group

Join Now