Aishwarya Rai | बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या रोमँटिक दृश्यांची खूप चर्चा झाली होती. एका मुलाखतीत रणबीरने या दृश्यांबद्दल असे काही वक्तव्य केले, ज्यामुळे बच्चन कुटुंबीय नाराज झाले होते. (Aishwarya Rai)
रोमँटिक दृश्य आणि रणबीरची प्रतिक्रिया
‘ए दिल है मुश्किल’ (Ae Dil Hai Mushkil) चित्रपटात रणबीर आणि ऐश्वर्यामध्ये काही रोमँटिक दृश्ये चित्रित करण्यात आली होती. ही दृश्ये शूट करताना रणबीर खूप नर्व्हस होता. ऐश्वर्याच्या गालाला स्पर्श करतानाही त्याला लाज वाटत होती, असे त्याने एका रेडिओ मुलाखतीत सांगितले होते. ऐश्वर्या एक अनुभवी अभिनेत्री असल्याने, तिला सहजपणे अभिनय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते, जेणेकरून ती फक्त अभिनय करत आहे, याची तिला सतत जाणीव करून देण्यात येत होती.
या मुलाखतीदरम्यान रणबीरने गमतीत म्हटले, ‘मला वाटलं की अशी संधी पुन्हा मिळणार नाही, म्हणून मी मौके पे चौका मारला!’ रणबीरच्या या वक्तव्यामुळे बच्चन कुटुंबीय नाराज झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, बच्चन कुटुंबातील (Bachchan Family) सदस्यांना चित्रपटातील दृश्यांवर कोणताही आक्षेप नव्हता, पण रणबीरचे वक्तव्य त्यांना चुकीचे आणि लाजिरवाणे वाटले. मात्र, रणबीरने आपल्या बोलण्याचा मुद्दा स्पष्ट करत, आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगितले. ऐश्वर्याबद्दल आदर व्यक्त करत, तो तिला एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि चांगली मैत्रीण मानतो, असे त्याने स्पष्ट केले.
‘ऐश्वर्या भारतातील एक प्रतिभावान महिला आहे. ‘ए दिल है मुश्किल’मधील तिच्या योगदानाबद्दल मी तिचा आभारी राहीन. तिचा अपमान करण्याचा विचारही मी करू शकत नाही.’, असं रणबीर म्हणाला होता.
मैत्रीपूर्ण संबंध
विशेष म्हणजे, ऐश्वर्या आणि रणबीरची पहिली भेट 1999 मध्ये झाली होती. रणबीरचे वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) दिग्दर्शित ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटात ऐश्वर्या मुख्य भूमिकेत होती. रणबीरने या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटादरम्यान त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. (Aishwarya Rai)
Title : Ranbir Kapoor statement on romantic scenes with Aishwarya Rai






