“राजीनामा घेऊन दाखवाच!”, डान्सबारच्या मुद्द्यावरून रामदास कदमांचा अनिल परबांवर जोरदार पलटवार

On: July 22, 2025 5:25 PM
Ramdas Kadam vs Anil Parab
---Advertisement---

Ramdas Kadam vs Anil Parab | राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुंबईतील सावली डान्सबार प्रकरणावरून शिवसेना नेते अनिल परब आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात सध्या जोरदार जुंपली आहे. परब यांच्या आरोपांनंतर आता योगेश कदम यांचे वडील आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेत, परब यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. (Ramdas Kadam vs Anil Parab)

“राजकीय द्वेषातून आरोप” – कदम यांचा पलटवार :

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन डान्सबार प्रकरणी गंभीर आरोप केले होते. सावली डान्सबार योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असल्याचा आरोप करत परब यांनी “लाज वाटत नाही का?” असा थेट सवाल उपस्थित केला होता. या आरोपांवर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देताना, “हिम्मत असेल तर राजीनामा देऊन दाखव,” असे खुले आव्हान दिले.

रामदास कदम म्हणाले की, परब यांनी सभागृहाच्या नियमांची पायमल्ली करत, सभागृहात उपस्थित नसताना मंत्र्यावर आरोप केले. त्यामुळे परब यांच्यावर दोन दिवसांत हक्कभंग आणला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. “मी राज्यात सगळे डान्सबार बंद करण्याची मोहीम सुरू करणार आहे,” असेही त्यांनी जाहीर केले.

Ramdas Kadam vs Anil Parab | “बाप दाखव, श्रद्धा घाल” – रामदास कदमांचा जोरदार टोला :

कदम यांनी परब यांना खुलं आव्हान दिलं की, “तुम्ही जो सातबारा दाखवला तो बघायला तुमच्या सगळ्या पिढ्या आणा. पुरावे असतील तर दाखवा, नाहीतर श्रद्धा घाला.” तसेच, “आम्ही डान्सबार सुरू करून लोकांचे संसार उध्वस्त केले नाहीत. आमचं कुटुंब संपवण्याचा विडा ठाकरे गटानं उचलला आहे, पण ते शक्य होणार नाही,” असेही कदम म्हणाले. (Ramdas Kadam vs Anil Parab)

“राजीनामा का मागता? पुरावे असतील तर मुख्यमंत्र्यांकडे द्या,” असे म्हणत रामदास कदम यांनी परब यांना सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी आणि माझी मुलं जिवंत असेपर्यंत आमच्यावर कोणताही डाग लागू देणार नाही.”

News Title: Ramdas Kadam Challenges Anil Parab Over Dance Bar Allegations: “Resign If You Have the Guts”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now