प्रसिद्ध क्रिकेटपटूने ‘या’ अभिनेत्रीसोबत गूपचूप उरकलं लग्न!

On: August 8, 2026 1:04 PM
Ramandeep Singh
---Advertisement---

Ramandeep Singh | भारतीय क्रिकेट आणि मनोरंजनसृष्टीतील आणखी एका जोडीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रिकेटपटू रमनदीप सिंहने अभिनेत्री चार्ली चौहानसोबत गुपचूप विवाह केला आहे. कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

रमनदीप-चार्लीचा खासगी विवाहसोहळा :

२९ वर्षीय क्रिकेटपटू रमनदीप सिंहने ‘कैसी ये यारियां’ मालिकेतील अभिनेत्री चार्ली चौहानसोबत विवाह केला. दोघांनी गुरुद्वारामध्ये पारंपरिक शीख पद्धतीने लग्न केले. या सोहळ्याला केवळ कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि निवडक मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे, दोघांनी आपल्या नात्याबाबत आतापर्यंत कमालीची गुप्तता राखली होती. त्यामुळे लग्नाचे फोटो अचानक समोर आल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

पंजाब किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही रमनदीप आणि चार्ली यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यात आल्या. या पोस्टनंतर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. क्रिकेटपटू अर्शदीप सिंहदेखील रमनदीपच्या लग्नात वराती म्हणून सहभागी झाला होता. त्यामुळे या खासगी विवाहसोहळ्याची चर्चा आणखी रंगली.

Ramandeep Singh | चार्ली चौहानचा अभिनय क्षेत्रातील प्रवास :

लग्नासाठी चार्ली चौहानने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. सोन्याचा मांगटीका, झुमके, नथ आणि मॅचिंग नेकलेससह तिने पारंपरिक वधूचा लूक केला होता. तिच्या हातात लाल चूडा होता. तर रमनदीप सिंह आयव्हरी रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला. दोघांच्या लग्नातील फोटोंमध्ये त्यांचा पारंपरिक लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडिया यूझर्ससह अनेक सेलिब्रिटींनीही त्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

चार्ली चौहानला सुरुवातीला MTV Roadies 7 या रिअॅलिटी शोमधून ओळख मिळाली. त्यानंतर ती ‘कैसी ये यारियां’ या मालिकेत झळकली. अभिनेता कुंवर अमरसोबत तिने ‘नच बलिए’मध्येही सहभाग घेतला होता.

News Title: Ramandeep Singh Marries Charlie Chauhan

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now