Ram Shinde l कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat nagarpanchayat) सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हं दिसत असून विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या ‘रात्रीत यशस्वी’ खेळीमुळे आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
मंगळवारी (ता. 15) राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेत नगराध्यक्षांना हटविण्याच्या प्रक्रियेत बदल करत अध्यादेश काढला. आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत (Usha raut) यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला.
अध्यादेश निघाला अन् ठराव दाखल; ‘प्री-प्लॅन्ड’ स्क्रिप्ट? :
कायद्यातील नव्या तरतुदीनुसार, आता नगराध्यक्षांना सदस्यांमार्फतच हटवता येणार आहे. याआधी ही प्रक्रिया शासनस्तरावरून केली जात होती. नव्या सुधारित कायद्यानुसार, दोन-तृतीयांश सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यास जिल्हाधिकारी 10 दिवसांच्या आत विशेष सभा घेणार.
गेल्या काही दिवसांपासूनच उषा राऊत यांच्याविरोधात नाराजी असल्याचे संकेत मिळत होते, पण तांत्रिक कारणामुळे कारवाई होऊ शकत नव्हती. मात्र, मंत्रिमंडळाने सुधारणा मंजूर करताच लगेचच ठराव दाखल झाल्यामुळे ही संपूर्ण घडामोड ‘पूर्वनियोजित’ होती, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय.
राम शिंदेंचा ‘डाव’ आणि ‘द्विट’ :
या प्रकरणामागे राम शिंदे (Ram shinde) यांची भूमिका ठळकपणे समोर येत आहे. त्यांच्या द्विटर हँडलवर 15 एप्रिलला केवळ नगराध्यक्षांच्या अध्यादेशाबाबतच पोस्ट करण्यात आली असून, इतर कोणत्याही निर्णयाचा उल्लेख नाही. त्यामुळेच त्यांच्या या एकाच ‘द्विट’वरून राजकीय रंग भरले जात आहेत.
— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) April 15, 2025
विशेष म्हणजे, 30 मार्चनंतर हे त्यांचं पहिलं ट्विट असल्याने यामागे काहीतरी विशेष दडलेलं असल्याचा संशय राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या खेळीमुळे रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस-शरद गटाच्या सत्तेला धक्का बसू शकतो.
कोणत्या पक्षाचे नगरसेवक ठरावात सामील? :
या अविश्वास ठरावात राष्ट्रवादी (शरद गट) चे 8, काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक सामील आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, राम शिंदे (Ram shinde) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने रणनीतीपूर्वक आघाडी गाठत सत्तास्थापनेची तयारी सुरू केली आहे. (Raam Shinde)
कर्जतमधील ही घडामोड आता फक्त नगराध्यक्षांच्या राजीनाम्यापर्यंत मर्यादित राहणार नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय समिकरणांवरही याचा परिणाम होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही मोहीम निर्णायक ठरू शकते.






