Maharashtra l विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होत आहेत. अशातच आता भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणार असल्याचं दिसून येत आहे.
विदर्भात अजित पवारांची खेळी :
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात मोठे बळ मिळणार आहे. मात्र भाजपचा बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला विदर्भात यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.
Maharashtra l अजित पवारांचं मोठं वक्तव्य :
या पक्ष प्रवेशाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य देखील केलं आहे. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा राष्ट्रवादी पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती आणखीनच मजबूत होईल असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व देखील केले आहे. त्यामुळे त्यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव आहे.
मात्र आता राजकुमार बडोले यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश झाल्याने या महत्त्वाच्या भागात पक्षाची स्थिती देखील मजबूत होणार आहे. तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले हे 2009 ते 2014 पर्यंत भाजपकडून पहिल्यांदा आमदार झाले होते.
News Title : Rajkumar Badole joins Ajit Pawar Group
महत्वाच्या बातम्या –
लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर; कोणी दिली ऑफर?
शरद पवारांचा शिंदे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने तुतारी फुंकली
पुण्यात राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र केसरीच्या घरावर ईडीची धाड!
भाजपच्या कट्टर नेत्यानी साथ सोडली! शिवसेनेत प्रवेश करणार
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात खेचणार असल्याचा इशारा!






