Rajendra Hagawane | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक असलेला सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. मात्र अटकेनंतरही त्याचा माजोरडेपणा कमी झालेला दिसत नाही. आज (२३ मे) सकाळी बावधन पोलीस ठाण्यात त्याला आणलं असताना पत्रकारांनी विचारलेल्या “पश्चात्ताप होतो का?” या प्रश्नावर त्याने नकार देत हात हलवला आणि कोणतीही पश्चात्तापाची भावना न दर्शवता अहंकाराने प्रतिक्रिया दिली. त्याची ही वर्तणूक पाहून अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.
अटकेआधी गाड्यांची थाटात फेरफटका :
पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीप्रमाणे, राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) अटकेपूर्वी थार, बलेनो यासारख्या गाड्यांमध्ये सात दिवस महाराष्ट्रभर फिरत होता. त्याने औंध जिल्हा रुग्णालय, पवना डॅमजवळचं फार्महाऊस, आळंदीमधील लॉज, कोगनोळीमधील हॉटेल हेरीटेज अशा अनेक ठिकाणी मुक्काम केले. एवढं फिरूनही त्याला लगेच अटक का झाली नाही, यावर पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, १७ मे रोजी औंध रुग्णालयात राजेंद्र उपस्थित होता, तेव्हा पोलिसांनी त्याला का अटक केली नाही? आणि २२ मे रोजी पुण्यात परतल्यानंतरही तो मोकाट कसा होता? या मुद्द्यांवरून पोलिसांचा तपासही चर्चेत आहे.
Rajendra Hagawane | प्रकरणाचा मुळ उद्देश – हुंडा आणि छळ :
वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नात दिलेल्या भरघोस हुंड्यानंतरही तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळल्याचं पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालं.
पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र (Rajendra Hagawane) आणि दीर सुशील (Sushil Hagawane) या पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून आता सर्वच पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र राजेंद्र हगवणेचा अटकेनंतरचा माज आणि निर्दय प्रतिक्रिया समाजमनाला दुखावणाऱ्या ठरत आहेत.








