निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर! राज ठाकरेंनी दाखवून दिली सर्वात मोठी चूक

On: October 14, 2025 8:20 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray । राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण आहे. राजकीय पक्षांची तयारीही सुरु झाली आहे. निवडणुकीच्या वातावरणात देशात आणि राज्यात मत चोरीच प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सर्व मोठे विरोधी पक्षांनी आज १४ ऑक्टोबरला राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना भेट दिली आहे.

अचानक मतदार नोंदणी का थांबवली जाते? :

या भेटी दरम्यान मतदार यादीतील घोळ, नावांची पुनरावृत्ती आणि खोट्या मतदार नोंदणी या मुद्द्यांवर आक्षेप घेतला. या सर्व घटनांचा तीव्र विरोध दर्शवला गेला आणि निवडणूक आयोगाला जाब विचारले. यामध्ये भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.

मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसे असू शकते? हे सर्व हास्यास्पद आणि गंभीर आहे. एकाच मतदाराचे नाव दोन दोन ठिकाणी कसे आहेत? असा गंभीर सवाल राज ठाकरे यांनी केली. मतदार यादी दुरुस्त झाल्या नंतरच निवडणूक व्हाव्या अशी थेट मागणी देखील या भेटीत राज ठाकरे यांनी केली. १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवांना मतदानाचा हक्क का नाही मिळत? अचानक मतदार नोंदणी का थांबवली जाते? असे प्रश्न देखील विचारले गेले.

Raj Thackeray | उद्या होणार पुन्हा बैठक :

राज्य निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष नेत्यामुढे आज चाललेली बैठक जवळपास सव्वा तास सुरु होती. याच मुद्द्यावर उद्या पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

या बैठकीची वेळ अद्याप कळवण्यात आली नाही. बैठकीची वेळ आणि इतर गोष्टी लवकरच ठरवण्यात येणार आहे.

Title – Raj Thackrey questions Election Commission about Election Scame 

Join WhatsApp Group

Join Now