राजकारण तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका

On: May 13, 2024 3:02 PM
Raj Thackeray
---Advertisement---

Raj Thackeray l लोकसभा निवडणूक 2024 अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण या निवडणुकीभोवती संपूर्ण देशाचं राजकारण फिरणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक उलाढाली पाहायला मिळाल्या आहेत. अशातच सर्वात मोठी उलाढाल म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

Raj Thackeray l फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवात केली 

शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची कळवा येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवार यांनी सुरुवात केली असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली घणाघाती टीका? 

राज ठाकरे यांनी कडू शब्दात शरद पवारांना टोमणा मारला आहे. “काय ढेकणा संगे हिराही भंगला. बरोबर शरद पवार बसले आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्रात कुणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवार यांनी केली आहे. शरद पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. 1977-78 साली गोष्ट असेल, पुलोदचं सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशाप्रकारचं फोडाफोडीचं राजकारण झालं, या गोष्टीला शरद पवार यांनी सुरुवात केली आहे.

मग 1991, याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फोडायला लावली आहे. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम देखील शरद पवारांनी केलं होतं”, असा घणाघात हल्लाबोल राज ठाकरेंनी केला आहे. “ज्या छगन भुजबळांना फोडलं, आज ते इथे असतील. माझा बाहेरुन पाठिंबा आहे त्यामुळे मी सध्या काहीही बोलू शकतो. पण मात्र आपल्याला थोडी फेविकॉलचा जोड लागणार आहे”, अशी मिश्किल टिप्पणी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

News Title – Raj Thackeray Big Allegation On Sharad Pawar In Mahayuti Thane Rally

महत्त्वाच्या बातम्या

अहमदनगरमध्ये आदल्या रात्री भाजपने पाडला पैशांचा पाऊस; व्हिडीओ समोर

या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळेल; विरोधकांना धूळ चारणार

“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण

“राजकारणी आहात की गावगुंड, अजित पवारांना निवडणूक जड जाणार”

नुडल्स खाणं जीवावर बेतलं, धक्कादायक घटना समोर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now