काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार

On: May 3, 2024 8:59 AM
Rahul Gandhi
---Advertisement---

Rahul Gandhi l कित्येक दिवसांपासून तिढा अखेर सुटला आहे. कारण रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराबाबतचा सस्पेंस आता संपला आहे. काँग्रेसने आज या दोन्ही जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना रायबरेलीच्या जागेसाठी उमेदवारी दिली आहे, तर पक्षाने किशोरीलाल शर्मा यांना अमेठीसाठी उमेदवारी दिली आहे.

प्रियांका गांधी वड्रा यांचा निवडणूक लढविण्यास नकार :

राहुल गांधींना अमेठीऐवजी रायबरेलीतून उमेदवार बनवण्यामागे दोन खास कारणे दिली जात आहेत. असे मानले जाते की राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते आणि त्यापूर्वी सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार होत्या, त्यामुळे पक्षाध्यक्षपद भूषवणाऱ्या नेत्यांसाठी ही जागा विचारात घेतली जात होती.

दुसरीकडे, प्रियांका गांधी वड्रा यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर, राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांचा राजकीय वारसा हाती घेण्यासाठी पुढे करण्यात आले आहे. 2004 ते 2019 या काळात सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार होत्या. खासदार असताना त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. याशिवाय त्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा देखील होत्या.

Rahul Gandhi l राहुल गांधी यांना उमेदवार म्हणून पाठवा; काँग्रेस नेत्यांची मागणी

फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर गेल्या आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथही घेतली होती. अशा परिस्थितीत त्या यावेळी लोकसभा निवडणूक लढवत नाहीत.

अमेठीबद्दल बोलायचे झाले तर राहुल गांधी यांना उमेदवार म्हणून पाठवा अशी येथील काँग्रेस नेत्यांची मागणी होती. मात्र, पक्षाने केएल शर्मा यांच्यावर बाजी मारली आहे. 2019 मध्ये, काँग्रेसच्या तिकिटावर स्मृती इराणी विरुद्धच्या राजकीय स्पर्धेत राहुल गांधी यांचा 55,000 मतांनी पराभव झाला. तर 2004 ते 2019 पर्यंत ते या जागेवरून खासदार होते.

News Title – Rahul Gandhi Raebarli Lok Sabha Election

महत्त्वाच्या बातम्या –

धक्कादायक… ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला

या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता

विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!

‘तुमच्यामुळे माझी आई गेली’; गावकऱ्याने सुजय विखेंना विचारला जाब

सुरेश रैनावर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील व्यक्तीचा अपघातात मृत्यू

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now