सागरी सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय, मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाला आता…

On: February 1, 2025 11:09 AM
QR Coded Aadhaar Card Mandatory For Fishermen in Maharashtra
---Advertisement---

Fishermen | राज्याची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाला (Fishermen) क्यूआर कोड असलेले आधारकार्ड जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे. मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी हे निर्देश दिले आहेत.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधारकार्ड नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याच्या सूचना राणे यांनी दिल्या होत्या.

सागरी सुरक्षेसाठी कठोर पावले

या सूचनेच्या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इंडियन मर्चंट शिपिंग कायदा आणि महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार, प्रत्येक मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर ठळक आणि कायमस्वरूपी दिसेल अशा पद्धतीने रंगविणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील बाजूला (वरच्या भागात) दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे दिसेल, तसेच नौकेच्या केबिनच्या छतावरही ठळकपणे कोरून रंगविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या नियमांची अंमलबजावणी केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नूतनीकरण आणि मासेमारी टोकन दिले जाणार आहे. जे नौका मालक या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचा मासेमारी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Fishermen)

Title : QR Coded Aadhaar Card Mandatory For Fishermen in Maharashtra

 

Join WhatsApp Group

Join Now