पुणेकरांसाठी गूड न्यूज! हडपसरला होणार नवीन रेल्वे टर्मिनल, ‘या’ महिन्यात सुरू होणार

On: August 16, 2025 12:56 PM
Hadapsar Railway Station
---Advertisement---

Hadapsar Railway Station | पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हडपसर येथे एक नवीन रेल्वे टर्मिनल उभारले जात आहे. या टर्मिनलचे काम जलद गतीने सुरू असून डिसेंबरअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षाखेरीसच हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकते. यामुळे पुण्यातील नागरिकांना प्रवासासाठी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होईल.

नवीन टर्मिनल उभारल्यामुळे पुणे स्थानकावरील भार कमी होणार असून विशेषतः पूर्व पुण्यातील भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हडपसर टर्मिनलमुळे प्रवासाचा वेळ वाचेल, तसंच गर्दीपासून सुटका होणार आहे. (Hadapsar Railway Station)

अमृत भारत स्टेशन योजनेतून उभारणी :

हडपसर रेल्वे टर्मिनलची उभारणी ‘अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पावर सुमारे 135 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे टर्मिनल पूर्ण झाल्यावर पुणे स्थानकावरील गाड्यांचा ताण लक्षणीय प्रमाणात कमी होईल. प्रकल्पांतर्गत जुन्या मालवाहतूक मार्गांचे रूपांतर, नवीन मालवाहतूक कॉरिडॉरची निर्मिती, आधुनिक स्टेशन इमारत, विस्तारित सर्क्युलेटिंग क्षेत्र, तसेच पार्किंगसारख्या सोयी निर्माण केल्या जात आहेत.

सुरुवातीला या टर्मिनलवरून 8 नवीन गाड्या धावणार असून त्यात हरंगुळ एक्स्प्रेसचाही समावेश असेल. या गाड्यांमुळे पूर्व भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोय होणार आहे.

Hadapsar Railway Station | प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा :

हडपसर टर्मिनलवरील अप आणि डाउन प्लॅटफॉर्मची लांबी 600 मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे 24 डब्यांच्या गाड्याही सहज थांबू शकतील. प्लॅटफॉर्म 1, 2 आणि 3 चे काम पूर्ण झाले असून लवकरच लिफ्ट, एस्केलेटर, 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल, रूफ प्लाझा, तसेच प्रवाशांच्या निवासासाठी निवासगृह उपलब्ध होणार आहे. (Hadapsar Railway Station)

या प्रकल्पामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद सेवा मिळणार असून पुणे शहराच्या रेल्वे वाहतुकीला एक नवीन दिशा मिळेल. हडपसर टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढेल आणि पुण्याचा रेल्वे नकाशा बदलणार आहे.

News Title: Pune’s New Hadapsar Railway Terminal to Open by December End

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now