Pune Weather Update | काल 13 मे रोजी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. ऐन दुपारी काळ्याकुट्ट अंधाराने मुंबई जणू अदृश्यच झाली होती. बऱ्याच ठिकाणी मोठं नुकसान झालं. आता पुण्याच्या हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हवामान विभागाने पुण्याच्या वातावरणाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
पुण्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. दिवसा ऊन तर संध्याकाळी वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे उकाड्यापासून खूप दिलासा मिळाला आहे. पण, अवकाळीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अजून काही दिवस पाऊस पडणार म्हटल्यावर शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढली आहे.
पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
काल पुण्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज होता.त्यानुसार सायंकाळी शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शिवाजीनगरमध्ये रात्री साडेआठवाजेपर्यंत 2.9 मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात पाऊस पडत असून, 11आणि 12 मे रोजी शहरात मुसळधार पाऊस झाला. आता पुढील चार दिवस दुपारी आकाश मुख्यतः निरभ राहून , संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
14,15,16 आणि 17 मे रोजी आकाश दुपारी मुख्यतः निरभ्र राहील. तर, संध्याकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
यासोबतच राज्याच्या सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
News Title : Pune Weather Update news
महत्त्वाच्या बातम्या-
‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले
‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण
नागरिकांची ‘त्या’ त्रासापासून होणार कायमची सुटका; सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो तयारीला लागा; राज्यात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार






