Pune Weather Update | गेल्या काही वर्षांपासून पुणे (Pune) शहरातील किमान (Minimum) आणि कमाल तापमानात (Maximum Temperature) वाढ होत आहे. जानेवारी (January) महिन्यात बऱ्यापैकी थंडी (Cold) असते, पण यंदा थंडी पडली असली तरी उष्णताही (Heat) वाढली आहे. (Pune Weather Update)
जानेवारीत सर्वाधिक 35.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, सरासरी तापमानाहून (Average Temperature) ते 5 ते 6 अंश सेल्सिअस अधिक (Higher) नोंदवले गेले आहे. त्यामुळे पुणे देखील आता ‘हॉट’ (Hot) होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंतच्या नोंदींमध्ये हे कमाल तापमान सर्वाधिक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
जानेवारीत उष्णता का?
सध्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) वरती कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार झालेले आहे. त्यामुळे खालील भागात हवा (Air) गरम (Hot) होते. त्याचाच परिणाम पुण्यातील तापमान उष्ण होत आहे. जे मार्च महिन्यामध्ये (March) आपल्याला उकाडा (Heat) जाणवतो किंवा तशी परिस्थिती निर्माण होते, ती दोन महिन्यांपूर्वी जानेवारीमध्येच अनुभवायला मिळत आहे.
सध्या उत्तर भारतातील (North India) काही भागात थंडी कमी-जास्त होत असून, राज्यातील तापमानात चढ-उतार (Fluctuations) पाहायला मिळत आहे. राज्यात थंडी कमीच असून, दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. (Pune Weather Update)
पुण्यातही 29 जानेवारीला उकाडा निर्माण झाला होता. यंदा तापमानात चढ-उतार झाली. थंडी-उष्णता पुणेकरांनी अनुभवला. सध्या दुपारी उन्हाचा चांगलाच चटका बसतोय.
रात्रीचे तापमानही वाढले (Night Temperature Also Increased)
रात्रीचे तापमान देखील पुण्यात वाढलेले आहे. रात्री सरासरी तापमानापेक्षा 2 डिग्री सेल्सियस अधिक नोंदवले जात आहे. त्यामुळे पुणे उष्ण होत आहे, अशी माहिती हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी (Meteorological Experts) दिली. (Pune Weather Update)








