पुणेकरांनो अलर्ट! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

On: March 31, 2026 8:17 PM
Pune Weather Alert
---Advertisement---

Pune Weather Alert | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी पुढील तीन तास अतिशय महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या 48 तासांपासून पुण्यासह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना देखील घडल्या, तर अनेक भागांत गारपीट झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

पुण्यासाठी पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे :

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच जोरदार वारे देखील वाहू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Pune Weather Alert)

पुण्यासोबतच सातारा, अहिल्यानगर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळावे आणि हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

Pune Weather Alert | राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे वातावरण :

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे दररोज दुपारनंतर अचानक हवामानात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ तर काही ठिकाणी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

News Title: Pune Weather Alert: Thunderstorm and Rain Likely in Next 3 Hours, Yellow Alert Issued

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now